spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

कारधा पोलिसांची धडक कारवाई: ४०० किलो मोहफास सडवासह एकाला अटक

हंसराज, भंडारा कारधा :- वैनगंगा नदीच्या पात्राचा आणि निर्जन काठाचा फायदा घेत सुरू असलेल्या अवैध हातभट्टी व्यवसायावर कारधा पोलिसांनी जोरदार प्रहार केला आहे. गुप्त माहितीच्या आधारे जुना सुरेवाडा परिसरात टाकलेल्या धाडीत पोलिसांनी तब्बल ४०० किलो मोहफास सडवा आणि इतर साहित्य असा एकूण ८१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, एका आरोपीला रंगेहात पकडले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कारधा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मौजा जुना सुरेवाडा येथील वैनगंगा नदीच्या काठावर अवैध दारू गाळली जात असल्याची खात्रीशीर माहिती पोलीस हवालदार साठवणे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने सापळा रचून नदीकाठी ‘रेड’ केली. यावेळी यशकुमार उरकुडा नागपुरे (वय ३२, रा. सुरेवाडा, ता. जि. भंडारा) हा आरोपी हातभट्टीवर दारू गाळताना आढळून आला.

गुन्हा दाखल आणि कारवाई पथक या प्रकरणी कारधा पोलिसांनी आरोपी यशकुमार नागपुरे याच्याविरुद्ध अप.क्रं. ५८१/२०२६, कलम ६५ (फ) महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. सदरची धाडसी कारवाई भंडारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, पोलीस निरीक्षक सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार साठवणे व त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.

Popular Articles