spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

किट्सच्या एस. अंजना यांचा गौरवपूर्ण सत्कार

सचिन चौरसिया, रामटेक :- कविकुलगुरू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स (किट्स), रामटेक येथील प्राचार्यांच्या स्वीय सहाय्यक म्हणून कार्यरत असलेल्या श्रीमती एस. अंजना ३१ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाल्या. आयोजित सत्कार समारंभात प्राचार्य डॉ. अविनाश श्रीखंडे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा गौरवपूर्ण सत्कार करण्यात आला. यावेळी रजिस्ट्रार पराग पोकळे, आस्थापना अधीक्षक राजेंद्र राव, विद्याशाखा अधीक्षक गजानन गुंडुकवार यांच्यासह राजेंद्र भिवगडे, राजेश कारेमोरे, प्रशांत फुरसुले, चंद्रशेखर जीभे, कुलभूषण महात्मे, राहुल ठाकरे, ओम डडोरे, सुनील दरवई, रत्नप्रकाश, सुनीता राव, विना रानी, संगीता भूरे, तृषिता महात्मे, रामराजू, सागर गाते, दिलीप दमाहे, संजय कोल्हे तसेच कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन विना रानी यांनी केले, तर गौरव दमाहे यांनी आभार मानले.

Popular Articles