spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 75 प्रकरणांची नोंद

– उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई 

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाद्वारे सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, 79 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई केली जात आहे. गुरूवार (ता. 02) शोध पथकाने 75 प्रकरणांची नोंद करून 88,600 रुपयाचा दंड वसूल केला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता करणे (रु. 400 दंड) या अंतर्गत 21 प्रकरणांची नोंद करून 8,400 रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 4 प्रकरणाची नोंद करून 400 रूपयाची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रू. 400 दंड) या अंतर्गत 7 प्रकरणाची नोंद करून 2,800 रूपयांची वसुली करण्यात आली. शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लासेस अशा संस्थांनी रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 1 प्रकरणाची नोंद करून 2,000 रूपयाची वसुली करण्यात आली. मॉल, उपहारगृहे, लाँजिग, बोर्डींगचे हॉटेल, सिनेमाहॉल, मंगल कार्यालये, कॅटरर्स सर्व्हिस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता या अंतर्गत 6 प्रकरणांची नोंद करून 12,000 रुपयांची वसुली करण्यात आली. वर्कशॉप,गॅरेजेस व इतर दुरूस्तीचे व्यवसायिकाने रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा इत्यादी ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 3 प्रकरणाची नोंद करून 3,000 रूपयाची वसुली करण्यात आली. हॉटेल मघे डिसेलटींग चेम्बर नसने, चोक झाल्यावर रस्त्यावर घाण परसवणे, कचरा शुल्क न भरणे व कचरा अन्य ठिकाणी फेकणे या अंतर्गत 5 प्रकरणाची नोंद करुन 25,000 रुपयाची वसुली करण्यात आली. लग्न समारंभाचे हॉल,सभागृह,कॅटरींग व हॉटेल यांनी उरलेले अन्न सार्वजनिक ठिकाणी टाकणे या अंतर्गत 3 प्रकरणाची नोंद करून 30,000 रूपयाची वसुली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 25 प्रकरणांची नोंद करून 5,000 दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली

तसेच उपद्रव शोध पथकाने लक्ष्मीनगर झोन अंतर्गत मे. सुश्रुत रेस्टॉरेंट, मे. ट्रेंडस कॅफे रेस्टॉरेंट व मे. जीवन रेस्टॉरेंट यांनी उरलेले अन्न ड्रेनेज मध्ये टाकल्यामुळे प्रत्येकी रू.10,000 या प्रमाणे रू. 30,000 चे दंड वसुल करण्यात आले. मे. जीवन रेस्टॉरेंट व मे. ट्रेंडस कॅफे रेस्टॉरेंट यांनी रस्त्यालगत हॉटेलचा कचरा टाकल्यामुळे प्रत्येकी रू. 5,000 या प्रमाणे रू. 10,000 चे दंड वसुल करण्यात आले. मे. ग्रीनलाईन मेडस्पेस यांनी घाण पाणी साठवल्यामुळे व रस्त्यावर वाहत असल्यामुळे रू.15,000 चे दंड वसुल करण्यात आले. धरमपेठ झोन अंतर्गत मे. ओरोज् द इटालियन वे व में. जगदीश रेस्टॉरेंट यांनी रस्त्यालगत हॉटेलचा कचरा टाकल्यामुळे व शुल्क न भरल्यामुळे प्रत्येकी रू. 5,000 या प्रमाणे रू.10,000 चे दंड वसुल करण्यात आले. हनुमान नगर झोन अंतर्गत मे. लिटील मिलेनियम यांनी विनापरवानगी विद्युत खांबावर फलक लावल्यामुळे रू.5,000 दंड वसुल करण्यात आले. धंतोली झोन अंतर्गत मे. पलाश डेव्हलपर्स यांनी रस्त्यालगत बांधकामाचे साहित्य टाकल्यामुळे रू.10,000 चे दंड वसुल करण्यात आले. नेहरुनगर झोन अंतर्गत मे. मां की रसोई यांनी रस्त्यालगत हॉटेलचा कचरा टाकल्यामुळे व शुल्क न भरल्यामुळे रू. 5,000 दंड वसुल करण्यात आले. गांधीबाग झोन अंतर्गत मे. भारती स्वीट भंडार यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू. 5,000 दंड वसूल करण्यात आले. सतरंजीपूरा झोन अंतर्गत मे. छोटेलाल फुड प्रॉडक्टस् यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू. 5,000 दंड वसूल करण्यात आले. मंगळवारी झोन अंतर्गत मे. रेड रोझ बार यांनी रस्त्यालगत हॉटेलचा कचरा टाकल्यामुळे व शुल्क न भरल्यामुळे रू. 5,000 दंड वसुल करण्यात आले. मे. राजवैभव इंफ्रा यांनी रस्त्यालगत बांधकामाचे साहित्य टाकल्यामुळे रू. 10,000 चे दंड वसुल करण्यात आले. उपद्रव शोध पथकाने 15 प्रकरणांची नोंद करून रू. 1,10,000 दंड वसुल केला.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.