spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

कन्हान नगरपरिषदेतील सफाई कर्मचाऱ्यांचा न्याया साठी संघर्ष पाचव्या दिवशीही कायम

– नगरपरिषद कन्हान-पिपरी प्रशासनावर गंभीर आरोप

कन्हान :- नगरपरिषद कन्हान-पिपरी येथिल सफाई कर्मचाऱ्यांचा न्याय आणि हक्कांसाठी सुरू असलेला संघर्ष पाचव्या दिवशीही कायम आहे. आंदोलनकर्त्यांनी नगरपरिषद प्रशासनावर स्थानिक जुन्या कामगारांना डावलुन बाहेरून नवीन कामगारांकडुन काम करून घेत असल्याचा आरोप केला आहे. यामागे कमी मजुरी वर काम करण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार सुमारे ४० कर्मचाऱ्यांच्या नावावर दरमहा सुमारे ४.२० लाख रुपये खर्च दाखवला जात असला, तरी प्रत्यक्ष टेंडरची रक्कम यापेक्षा अधिक असल्याचा दावा करण्यात आला आहे. ठेकेदार आणि काही अधिकाऱ्यांच्या संगनमतातुन अनेक वर्षांपासुन आर्थिक गैरव्यवहार सुरू असल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. या शिवाय नगरपरिषदेचे नगराध्यक्ष आणि नगरसेवकांनी आंदोलनस्थळी भेट देऊन सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणुन घेण्याचेही टाळल्याचा आरोप आंदोलन कर्त्यांनी केला आहे. लोकप्रतिनिधींच्या या भूमिकेबाब त नाराजी व्यक्त करत, त्यांच्या मौनामुळे भ्रष्टाचाराला अप्रत्यक्ष पाठबळ मिळत असल्याचा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.

सफाई कर्मचाऱ्यांनी नवीन टेंडर प्रक्रिया पूर्ण होई पर्यंत प्रतिदिन ६०० रुपये मजुरी देण्याची आणि त्यानंतर शासन नियमानुसार संपूर्ण वेतन लागु करण्या ची मागणी केली आहे. तसेच कथित आर्थिक गैरव्यव हाराची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशीही मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.

दरम्यान या प्रकरणात नगरपरिषद प्रशासनाची अधि कृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे प्रशासनाच्या स्पष्टीकरणाकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.