spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला

कामठी :- नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लिहीगावसमोर सर्व्हिस रोडलगत, कुलर कंपनीजवळ एका अंदाजे ३५ ते ४० वर्षीय अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ५ जुलै रोजी सकाळी सुमारे ७.५८ वाजता संबंधित व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत आढळून आली. त्यांना तातडीने उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय, कामठी येथे दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.

मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसून, प्राप्त वैद्यकीय सूचनेवरून नवीन कामठी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक झगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Popular Articles