spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

मनपाच्या सीबीएसई शाळेसाठी प्रस्ताव पाठवा

– मनपाच्या शिक्षण समितीची विशेष बैठकीत सभापती संतोषदेवी लढ्ढा यांचे निर्देश

नागपूर :- नागपूर महानगरपालिका शिक्षण विशेष समितीची (ता.६) सोमवारी समिती सभापती संतोषदेवी लढ्ढा अध्यक्षतेखाली समिती कक्षात मनपाच्या शिक्षण विभागाशी संबंधित विविध विषयांवर आढावा बैठक घेण्यात आली. यासोबतच मनपा शाळा सीबीएसई करण्यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याचे निर्देश समिती सभापती संतोषदेवी लढ्ढा यांनी दिले.

बैठकीत शिक्षण विशेष समिती सदस्य राम कुंभलकर,  वैशाली उदापूरकर, सय्यद मुस्कान सय्यद इरफान, मनपा शिक्षणाधिकारी वंदना महाजन, उपशिक्षणअधिकारी  सुभाष उपासे,सीमा खोब्रागडे, शाळा निरीक्षक प्रशांत टेंभुर्ण, अंजुम आरा, शगुफ्ता परवीन, विजय सोनी ,समग्र शिक्षा प्र.सहायक कार्यक्रम अधिकारी कविता शेख,  विनय बगले यांच्यासह इतर उपस्थित होते.

यावेळी शिक्षण विशेष समिती सभापती संतोषदेवी लढ्ढा यांनी शिक्षक भरतीच्या संदर्भातील विविध विषयावर सविस्तर चर्चा केली. यावेळी २७ जून पासून ९२ कंत्राटी शिक्षकांची भरती पद्धतीने रुजू झाले आहे. लवकरच उर्वरित कंत्राटी भरती करण्यात यावी, मनपाच्या सर्व शाळांमध्ये पुस्तके, गणवेश विद्यार्थ्यांना देण्यात आले आहे. काही स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने दहावीतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळावे, यासाठी विशेष वर्ग सुरू करण्याचा प्रस्ताव तयार करण्याचेही निर्देश सभापती यांनी दिले. यासोबतच पी एम श्री संजय नगर येथील शाळेत कनिष्ठ महाविद्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना देखील त्यांनी यावेळी दिली.

बालवाडी आणि प्राथमिक शाळेसाठी हस्तकला वर्गासाठी टिल्टेड शीट आणि रंगरंगोटी साहित्य उपलब्ध करून देण्यात यावे, मनपाच्या २१ शाळांमध्ये सर्व शाळा समांतर दिसायला प्रेरणादायी भित्तीचित्र व रंगरंगोटी करण्यात यावे, प्रार्थनेच्या वेळी सर्व मनपा शाळांमध्ये वंदे मातरम गीत गायले जावे, शिक्षणोत्सव मध्ये पाढे पाठांतर स्पर्धा आयोजित करण्यात यावी, सर्वात जास्त पाढे पाठ असणाऱ्या विद्यार्थ्याला बक्षीस दिले देण्यात यावे, असेही निर्देश त्यांनी यावेळी दिले.

तसेच महानगरपालिका बालवाडी शाळांचे नामकरण ‘बाल गोकुलम’ असे करण्याबाबत चर्चा करण्यात आली. प्रत्येक विधानसभा क्षेत्रात दोन इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरू करण्याबाबत चर्चा करण्यात आली, सेमी-इंग्रजीच्या २१ शाळांचे नूतनीकरण करून त्यांना पूर्णतः स्मार्ट क्लासरूम, आधुनिक प्रयोगशाळा (लॅब), संगणक सुविधा आणि इतर आधुनिक शैक्षणिक संसाधनांनी सज्ज करण्याबाबत चर्चा करण्यात आली.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.