spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

चाचेरच्या विकासासाठी सरपंचा आक्रमक: पालकमंत्र्यांकडे ४ मागण्यांचे निवेदन, पीडब्ल्यूडी व डीपीसी कडे सतत पाठपुरावा सुरू

किशोर साहू, मौदा :- ग्राम पंचायत चाचेरच्या सरपंचा लुंबिनी महेश कलारे यांनी गावाच्या चौफेर विकासासाठी कंबर कसली आहे. गेल्या महिनाभरात त्यांनी राज्याचे महसूल मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन गावातील रस्ते, वीज व मुलभूत सुविधांसाठी तब्बल ४ महत्त्वाची निवेदने सादर केली आहेत. विशेष म्हणजे, निवेदनांवर पालकमंत्री कार्यालयाने तात्काळ दखल घेत ती संबंधित विभागांकडे वर्ग केली आहेत.

बाजार चौक ते नागठाणा डांबरी रस्ता दुरुस्ती , बसस्टॉप ते एरिगेशन कॉलनी सिमेंट रस्ता व नाली बांधकाम ,  बसस्टॉप ते एरिगेशन कॉलनी या मार्गावर 30 नग स्ट्रीट लाईट तसेच बसस्टॉप, बाजार चौक व काळा ऑफीस परिसरात 12 मीटर उंचीचे 3 हायमास्ट लाईट बसविणे , लक्ष्मीनारायण मंदीर ते रामटेक-मौदा रोड पर्यंतचा रस्ता मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सिमेंट काँक्रीट करणे, या चार मागण्यांसाठी संबंधित पीडब्ल्यूडी व डीपीसी या विभागाकडे सरपंच लुम्बिनी महेश कलारे यांच्या सतत पाठपुरावा सुरु आहे, हे विशेष!

“विकास कामे करणे ही माझी नैतिक जबाबदारी आहे, 

विविध विकास कामांसाठी व गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर आहे. गावकऱ्यांनी माझ्यावर जो विश्वास टाकला, त्याला जागणे व गावाचा चेहरामोहरा बदलणे ही माझे कर्तव्य आहे,” असे स्पष्ट मत सरपंच लुंबिनी कलारे यांनी व्यक्त केले आहे.

Popular Articles