spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

ट्रॅफिक पोलिस कर्मचाऱ्याकडून मारहाणीचा आरोप; निष्पक्ष चौकशी करून दोषीवर कारवाईची मागणी

– पत्रकार परिषदेत पीडित मनीष गिरी यांची न्यायाची हाक

नागपूर :- वानाडोंगरी, हिंगणा रोड येथील पायल कॅफेचे संचालक मनीष लहू गिरी यांनी ट्रॅफिक पोलिस कर्मचारी मनीष भोसले यांच्याकडून मारहाण, शिवीगाळ व धमकी दिल्याचा गंभीर आरोप करत पत्रपरिषदेत निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे. या प्रकरणात दोषी आढळणाऱ्या संबंधित पोलिस कर्मचाऱ्यावर कठोर कायदेशीर व विभागीय कारवाई करण्यात यावी, तसेच आपल्याला न्याय मिळावा, अशी मागणी त्यांनी केली.

मनीष गिरी यांनी सांगितले की, १३ जून रोजी त्यांच्या कॅफेसमोर केबी बीअर अँड वाईन शॉपचा फलक लावण्याच्या वादातून संबंधित ट्रॅफिक पोलिस कर्मचाऱ्याने त्यांना मारहाण केली.

या घटनेत त्यांच्या दोन्ही कानांना गंभीर दुखापत झाली असून वैद्यकीय तपासणीत ऐकण्याची क्षमता कमी झाल्याचे तसेच टिनिटसचा त्रास सुरू झाल्याचे अहवालात नमूद असल्याचा दावा त्यांनी केला. या प्रकरणाचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध असून त्यामध्ये संपूर्ण घटना स्पष्टपणे रेकॉर्ड झाल्याचा दावा गिरी यांनी केला. एमआयडीसी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ११७ (२) व ३५२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहितीही त्यांनी दिली. प्रशासनाकडे त्यांनी घटनास्थळा वरील सीसीटीव्ही फुटेज जप्त करून फॉरेन्सिक तपासणी करावी, वैद्यकीय अहवाल व इतर पुराव्यांच्या आधारे निष्पक्ष चौकशी करावी, दोषी आढळल्यास संबंधित पोलिस कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई करावी तसेच स्वतःला व कुटुंबाला संरक्षण द्यावे, अशा प्रमुख मागण्या केल्या.

यावेळी मनीष गिरी म्हणाले, “कायदा सर्वांसाठी समान असला पाहिजे. सामान्य नागरिक असो किंवा पोलिस कर्मचारी, दोषी कोणताही असला तरी त्याच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. मला न्याय मिळावा आणि गुन्हेगाराला कठोर शिक्षा व्हावी, हीच माझी मागणी आहे.” तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नागपूरचे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे- पाटील यांच्या नेतृत्वाखाली या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होऊन मला न्याय मिळावा, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

(व्हिडिओ प्रकाशित झालेला होता त्यावेळी पोलीस वाल्यांनी मनीष गिरी च्या कानावर फटाफट झापडा मारून त्याचा कान खराब झाला त्याचा जिंदगी भर कान खराब झाला ?

याला कोन जबाबदार !

दुसरी गोष्टी – पोलिस वाल्यांना शिव्या गाळ करणे शोभा देत नाही त्यांनी खालच्या लेव्हलच्या शिव्या दिल्या आहे.

Popular Articles