नागपूर :- नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (निमा), नागपूर शाखेच्या वतीने राष्ट्रीय चिकित्सक दिनानिमित्त ज्येष्ठ व सेवाभावी वैद्यकीय तज्ज्ञांचा सत्कार तसेच सातत्यपूर्ण वैद्यकीय शिक्षण (सीएमई) प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले. स्थानिक केडीके अभियांत्रिकी महाविद्यालय, नंदनवन येथे झालेल्या या कार्यक्रमाला वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ, डॉक्टर व विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक ज्येष्ठ हृदयरोगतज्ज्ञ डॉ. प्रमोद मुंडडा यांनी भारतीय चिकित्सा पद्धतीचा समन्वय साधून रुग्णहिताला प्राधान्य देणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले. त्यांनी “रक्तदाब आणि त्याचे व्यवस्थापन” या विषयावर उपस्थित डॉक्टरांना सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची सुरुवात भगवान धन्वंतरी यांच्या प्रतिमेचे पूजन, माल्यार्पण व दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी निमा केंद्रीय सल्लागार डॉ. रविंद्र बोथरा प्रमुख उपस्थित होते. यावेळी वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे डॉ. प्रदीप कोल्हे, डॉ. रजना वाघमारे, डॉ. मिलिंद सूर्यवंशी, डॉ. राजेश उरमाले आणि डॉ. सविता शर्मा यांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.निमा नागपूरचे अध्यक्ष डॉ. नितीन कान्होलकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. अभय कडू व डॉ.अभिषेक चतुर्वेदी यांनी केले, तर सचिव डॉ. शरद ठाकूर यांनी आभार मानले. कार्यक्रमाला डॉ. शैलेंद्र अग्रवाल, डॉ. विकास चिटमुलवार, डॉ. पंकज भोयर, डॉ. शांतिदास लुंगे, डॉ. मोहन येडे, डॉ. पंकज थूल, डॉ. वीणा फाये, डॉ. वैशाली चरडे, डॉ. जगमोहन राठी, डॉ. सुरेश खंडेलवाल, डॉ. गौतम जोगळ, डॉ. दिलीप फाये, डॉ. ईला बोथरा, डॉ. भावना भलमे, डॉ. गणेश टेकाळे, डॉ. प्रदीप भुते, डॉ. शेखर तनमने, डॉ. संजय द्विवेदी, डॉ. अनिमेष भोयर, डॉ. मुमताज आलम, डॉ. अर्पिता चाफले यांच्यासह अनेक वैद्यकीय तज्ज्ञ, डॉक्टर व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रम उत्साहपूर्ण यशस्वीरीत्या संपन्न झाला.
राष्ट्रीय चिकित्सक दिनानिमित्त निमा, नागपूर तर्फे ज्येष्ठ वैद्यकीय तज्ज्ञांचा सन्मान; सीएमई प्रशिक्षण सत्र उत्साहात संपन्न









