spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

महापौर निता ठाकरे यांनी केली फ्रेंड्स कॉलनी येथील नाल्याची पाहणी

नागपूर :- महापौर निता ठाकरे यांनी मंगळवारी (ता.७) फ्रेंड्स कॉलनी चौक स्थित नाल्याची पाहणी केली. स्थानिक नागरिकांनी नाल्या संदर्भात पाहणी करण्याची महापौर यांना विनंती केली होती. त्याविनंतीनुसार महापौरांनी पाहणी करीत पावसाळ्यात स्थानिक नागरिकांना त्रास होणार नाही, याची काळजी घेत, नाल्या संदर्भात सर्वेक्षण करण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिले.

याप्रसंगी क्रीडा विशेष समिती सभापती दर्शनी धवड, नगरसेविका साधना बरडे, नगरसेवक विक्रम ग्वालबंशी, मनपाचे मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ गजेंद्र महल्ले प्रामुख्याने उपस्थित होते.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर परिसरात साचपाण्याची समस्या निर्माण होऊ नये आणि नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आवश्यक उपाय योजनांचा आढावा महापौर निता ठाकरे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून घेतला.

फ्रेंड्स कॉलनी परिसरातील स्थानिक नागरिकांनी नाल्यामुळे होणाऱ्या समस्यांकडे महापौरांचे लक्ष वेधले होते. पावसाळ्यात नाल्यातील कचरा आणि अडथळ्यांमुळे पाणी तुंबून परिसरातील घरांत शिरण्याचा धोका असतो, अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली होती. या विनंतीला त्वरित प्रतिसाद देत महापौर निता ठाकरे यांनी थेट घटनास्थळी जाऊन पाहणी केली. पाहणी दरम्यान नाल्याची सद्यस्थिती आणि त्यातील अडथळे समजून घेतल्यानंतर महापौरांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने नाल्याच्या संदर्भात सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले.

Popular Articles