spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

सफाई कर्मचाऱ्यांसाठी च्या सदनिकांचे “महर्षि सुदर्शन वाल्मिकी वसाहत” असे नामकरण

– उपमहापौर यांच्या अध्यक्षतेत व सत्तापक्ष नेते यांच्या उपस्थितीतील बैठकित निर्णय

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेचे सत्तापक्ष नेते नरेद्र(बाल्या) बोरकर यांच्या सभा कक्षात उपमहापौर लिला हाथीबेड यांच्या अध्यक्षतेखाली वाल्मिकी समाज बांधवांच्या प्रतिनिधींची बैठक मंगळवारी (ता.०७) पार पडली. बैठकीत सफाई कर्मचाऱ्यांसाठी उभारण्यात येणाऱ्या सदनिकांचे नाव “महर्षि सुदर्शन वाल्मिकी वसाहत” असे करण्याच्या सत्तापक्ष नेते नरेंद्र बोरकर यांच्या प्रस्तावाला उपस्थितांनी एकमताने मंजुरी प्रदान केली.

मौजा नारी येथे सफाई कर्मचारी यांच्याकरिता ३९२ इडब्ल्यूएस सी सदनिका प्रकल्प उभारण्यात येत आहे. या प्रकल्पाचे भूमिपूजन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर निता ठाकरे, स्थायी समिती सभापती  शिवानी दाणी वखरे यांच्यासह सर्व आमदार यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवार १२ जुलै रोजी होणार आहे. त्याअनुषगाने उपमहापौर लिला हाथीबेड यांच्या अध्यक्षतेखाली वाल्मिकी समाज बांधवांच्या प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली. यावेळी ज्येष्ठ नगरसेवक सुधीर (बंडू) राऊत, नगरसेवक विजय होले, नगरसेवक रितेश गावंडे, मनपाच्या मुख्य अभियंता लीना उपाध्ये यांच्यासह सफाई कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

शहराला स्वच्छ, सुंदर आणि स्वस्थ राखण्यासाठी अहोरात्र कार्यरत असणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांसाठी उभारण्यात येणाऱ्या सदनिकांच्या नावाबद्दल बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी भूमिपूजन कार्यक्रमाच्या नियोजनाबद्दल सविस्तरपणे चर्चा करण्यात आली.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.