spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

सहकार सप्ताहानिमित्त वृक्षारोपण व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

नागपूर :- सहकारी संस्था (लेखापरीक्षण) नागपूर विभागात सहकार सप्ताह – २०२६ निमित्त विविध जनहिताचे उपक्रम राबविण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी कार्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले, तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहभागातून पर्यावरण संरक्षणाची जनजागृती करण्यात आली. याच अनुषंगाने अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात रक्तदाब, मधुमेह, हिमोग्लोबिन आदी विविध आरोग्य तपासण्या करण्यात आल्या. वैद्यकीय तज्ज्ञांनी उपस्थितांना निरोगी जीवनशैली, संतुलित आहार व नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले.

याशिवाय सहकार जनजागृती अभियाना अंतर्गत सहकार क्षेत्रातील विविध योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आली. तसेच सहकार विषयावरील प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करून सहकारी क्षेत्रातील कार्यपद्धती, पारदर्शकता व लेखापरीक्षणाची भूमिका याबाबतीत मार्गदर्शन केले. या सर्व उपक्रमांना अधिकारी व कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, समाजोपयोगी उपक्रमांद्वारे सहकार चळवळीला अधिक बळकटी देण्याचा संकल्प विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था नागपूर विभाग नागपूर चे संदानंद वुईके यांनी यावेळी व्यक्त केला.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.