spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

गडरलाईन व नालेसफाईची कामे तातडीने पूर्ण करावी

– महापौर निता ठाकरे यांनी घेतला हनुमाननगर व धंतोली झोनचा आढावा

नागपूर :-  पावसाळ्यात नागरिकांना त्रास होणार नाही, यासाठी गडरलाईन, नालेसफाई व वाहतुकीला अडचणीचे ठरणारे अतिक्रमण व अवैध बाजारांवर कडक कारवाई करावी, त्याचप्रमाणे गडरलाईनचे चेंबर खुले राहणार नाही, याची काळजी घ्यावी, रस्त्याचे व गडरलाईनचे काम सुरू असलेल्या ठिकाणी बॅरीकेंटिंग करावे, असे निर्देश महापौरांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले.

महापौर निता ठाकरे यांनी आज (ता. 7) हनुमाननगर झोन व धंतोली झोन कार्यालयात नगरसेवक व अधिकाऱ्यांशी चर्चा करून पावसाळापूर्व कामाचा आढावा घेतला. यावेळी उपमहापौर लिला हाथीबेड, स्थायी समितीच्या सभापती शिवानी दाणी-वखरे, हनुमाननगर झोनच्या सभापती ज्योती देवघरे, धंतोली झोनच्या सभापती भारती बुंदे, आरोग्य विशेष समितीच्या सभापती मनीषा अतकरे, अग्निशमन विशेष समितीच्या सभापती रुपाली ठाकूर यांच्यासह हनुमानगर झोनमधील नगरसेवक योगेश मडावी, नगरसेवक अजय बोढारे, नगरसेवक गणेश चर्लेवार, नगरसेवक चंद्रकांत खंगार, नगरसेविका मंगला मस्के, नगरसेविका मानसी शिमले, नगरसेविका सानवी शेंडे, नगरसेवक रितेश पांडे, नगरसेवक राम कुंभलकर, नगरसेवक नागेश मानकर, नगरसेवक संजय ठाकरे, नगरसेविका मनीषा नगरधनकर, नगरसेवक बाबाराव तायडे त्याचप्रमाणे धंतोली झोन कार्यालयात झालेल्या बैठकीला नगरसेविका सुजाता कोंबाडे, नगरसेवक सुहास नानवटकर, नगरसेविका कांचन चव्हाण, नगरसेवक  मनोज साबळे, नगरसेवक अंकित चौधरी, नगरसेवक  मनोज गावंडे, नगरसेविका शीला तराळे, नगरसेवक  रमेश भंडारी नगरसेविका पूजा भूगावकर उपस्थित होते. त्याचप्रमाणे अतिरिक्त आयुक्त अंकित, उपायुक्त राजेश भगत, सहाय्यक आयुक्त नरेंद्र बावनकर, सहाय्यक आयुक्त प्रमोद वानखेडे, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, कार्यकारी अभियंता श्रीकांत वाईकर, कार्यकारी अभियंता अनिल गेडाम, कार्यकारी अभियंता विजय गुरुबक्षानी, झोन स्वच्छता अधिकारी  राजेश गायधनी, उपअभियंता दीपक मेश्राम, अग्निशमन विभागाचे अधिकारी रविंद्र मरसकोल्हे व शिवाजी शिर्के उपस्थित होते.

यावेळी हनुमानगर झोन मधील नगरसेवकांनी आपआपल्या प्रभागातील समस्यांची माहिती महापौरांना दिली. हनुमानगर झोनमधील नगरसेवकांनी अतिक्रमण, अवैध बाजार व वाहतूक कोंडीचे प्रश्न प्रामुख्याने मांडले. अतिक्रमण कारवाई करताना प्रवर्तन विभागाने सातत्य ठेवावे, जेणेकरून पुन्हा अतिक्रमण होणार नाही. अनेक ठिकाणी अवैध बाजार भरत असल्याने नागरिकांना वाहतुकीचा त्रास होतो व बाजार संपल्यानंतर उरलेला केरकचरा तेथे टाकून देत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरत असल्याचे नगरसेवकांनी निदर्शनास आणून दिले. रस्ते व गडरलाईन सफाईसाठी प्रशासनाने अधिक सजग राहावे, असेही महापौरांनी सांगितले. त्याचप्रमाणे नगरसेवकांच्या तक्रारींचे निराकरण प्राधान्याने करावे, असेही महापौरांनी निर्देश दिले. काही नगरसेवकांनी रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांचा मुद्या उपस्थित केला.

धंतोली झोन मधील नगरसेवकांनी नालेसफाई व गडरलाईन सफाईचे मुद्दे या बैठकीत मांडले. धंतोली झोनमध्ये असलेल्या सर्व नाल्यांची सफाई झालेली आहे. गडरलाईनचे सफाई करण्यासाठी नवीन सक्शन मशीन महापालिकेच्या ताफ्यात आलेल्या आहेत. प्रत्येक झोन एक नवीन सक्शन मशीन देण्याचा मानस असल्याचे महापौरांनी यावेळी सांगितले. पावसाळ्यात झाडे कापण्याचे काम उद्यान विभागाने करावे तसेच एमएसईबीच्या अधिकाऱ्यांनी तोडलेल्या फांद्यांची विल्हेवाट लावावी, अशी सूचना करण्यात आली. त्याचप्रमाणे पावसाळ्याचे दिवस असल्याने चेंबर खुले राहणार नाही, याची काळजी घ्यावी तसेच काम सुरू असलेल्या ठिकाणी बॅरिकेटिंग न चुकता करावे, असेही निर्देश महापौर ठाकरे यांनी दिले.

धंतोली कार्यालयात रेन हार्वेस्टिंगची व्यवस्था होणार

मनपाच्या धंतोली झोन कार्यालयात रेन हार्वेस्टिंगची व्यवस्था उभारण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन महापौर निता ठाकरे यांच्याहस्ते झाले. यावेळी उपमहापौर लिला हाथीबेड, स्थायी समितीच्या सभापती शिवानी दाणी वखरे, धंतोली झोनच्या सभापती भारती बुंदे, सहाय्यक आयुक्त प्रमोद वानखेडे व कार्यकारी अभियंता अनिल गेडाम उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.