spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य अध्यासन केंद्राच्या सल्लागार समितीवर अमोल तपासे व हिमगौरी देशपांडे यांची नियुक्ती

नागपूर :- गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली अंतर्गत कार्यरत असलेल्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर साहित्य अध्यासन केंद्राच्या सल्लागार समितीवर नागपूरचे लेखक, साहित्यिक तथा कवी  अमोल तपासे आणि हिमगौरी देशपांडे (वरोरा, जि. चंद्रपूर) यांची नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

याबाबतचे पत्र विद्यापीठातील अध्यासन केंद्रामार्फत जारी करण्यात आले असून, सदर पत्रानुसार दोन्ही सदस्यांनी अध्यासन केंद्राच्या विविध शैक्षणिक, साहित्यिक व संशोधनात्मक उपक्रमांमध्ये मार्गदर्शन व सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. सल्लागार समितीवर अमोल तपासे यांची नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आल्याबद्दल नागपूर तथा विदर्भातील साहित्य क्षेत्रातील मंडळीद्वारे त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.

गोंडवाना विद्यापीठाची स्थापना २७ सप्टेंबर २०११ रोजी महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचनेनुसार झाली असून, सध्या विद्यापीठाचे कामकाज महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ अंतर्गत चालते. विद्यापीठाच्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर साहित्य अध्यासन केंद्रामार्फत सावरकरांचे साहित्य, विचार, इतिहास आणि संशोधनाला चालना देण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या सदस्यांच्या माध्यमातून या कार्याला अधिक बळ मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Popular Articles