spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

भाजपा कार्यालय मौदा येथे डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांची १२५ वी जयंती उत्साहात साजरी

किशोर साहू, मौदा :- भारतीय जनता पार्टी कार्यालय, मौदा येथे भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांची १२५ वी जयंती आज मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते डॉ. मुखर्जी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व अभिवादन करून झाली.

याप्रसंगी टेकचंद सावरकर,माजी आमदार कामठी/मौदा,भगवान भावनकुळे,मंडळ अध्यक्ष मौदा तालुका,नरेशजी मोटघरे मौदा तालुका विस्तारक,  मोरेश्वर सोरते मौदा शहर अध्यक्ष,मुकेश अग्रवाल माजी तालुका अध्यक्ष अशोक हटवार प्रदेश कार्यकारणी सदस्य महा.रमेश कुंभलकर, राहुल पोटभरे, महा. नीलम घाटोळे,रोशन घाटोळे, विनोद मदनकर, विष्णु देशमुख, रेवा देशमुख,रोशन उमप, विशाल सेलोकर, गोपाल गिरमेकर, अमित तिल्लीखेडे, दिनेश पटले, राम गजभिये, रामपालजी धांडे, सुरेंद्र बाभरे राजेश सपाटे ,मारोती साठवणे, देवराव करडभाजणे, निलेश बावनकुळे,  मानकर,समर्थ, काटकर,अंकित वाडिभस्मे, राहुल हटवार, निखिल बडवाईक,अश्विन गुरुभेले यांच्यासह मौदा तालुका व शहरातील भाजपचे सर्व प्रमुख पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांनी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या ‘एक देश, एक विधान, एक प्रधान’ या विचारसरणीवर प्रकाश टाकला. काश्मीरसाठी दिलेले बलिदान, शिक्षण क्षेत्रातील योगदान आणि राष्ट्राच्या एकात्मतेसाठी त्यांनी केलेल्या कार्याचे स्मरण करून देण्यात आले.

डॉ. मुखर्जी यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

Popular Articles