spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

भिलगावात मोफत रांगोळी प्रशिक्षणाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

कामठी :- भिलगाव येथे अंशीता ब्युटी अकॅडमीच्या संचालिका स्वाती कवळे यांच्या पुढाकाराने तसेच भाजपच्या लतेश्वरी ब्रह्मा काळे यांच्या सहकार्याने महिलांसाठी आयोजित करण्यात आलेले मोफत एकदिवसीय रांगोळी प्रशिक्षण शिबिर उत्साहात पार पडले. या उपक्रमाला परिसरातील महिला व युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

प्रशिक्षणादरम्यान पारंपरिक, आधुनिक तसेच सण-उत्सवासाठी उपयुक्त अशा विविध प्रकारच्या आकर्षक रांगोळ्यांचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. रांगोळी कलेतील बारकावे, रंगसंगती, रचना, संतुलन आणि अल्प वेळेत सुंदर रांगोळी साकारण्याच्या प्रभावी पद्धतींचे मार्गदर्शन करण्यात आले. सहभागी महिलांनी प्रत्यक्ष रांगोळी काढून प्रशिक्षणाचा लाभ घेतला.

यावेळी स्वाती कावळे यांनी महिलांमध्ये दडलेल्या कलागुणांना योग्य व्यासपीठ मिळाल्यास त्या स्वावलंबनाच्या दिशेनेही यशस्वी वाटचाल करू शकतात, असे सांगून अशा कौशल्याधारित प्रशिक्षणात अधिकाधिक महिलांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले.

लतेश्वरी ब्रह्मा काळे यांनी महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि आत्मविश्वास वाढविण्यासाठी अशा उपक्रमांची गरज अधोरेखित केली. कला, कौशल्य आणि सर्जनशीलतेच्या माध्यमातून महिलांना नवीन संधी उपलब्ध करून देण्यासाठी भविष्यातही अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या शेवटी सहभागी महिलांनी प्रशिक्षणाबद्दल समाधान व्यक्त करत आयोजकांचे मनःपूर्वक आभार मानले. कौशल्य विकासासोबतच महिला सक्षमीकरणाचा संदेश देणारा हा उपक्रम परिसरात विशेष कौतुकाचा विषय ठरला.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.