spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

वृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

कामठी :- महाराष्ट्र शासनाच्या कन्या वन समृद्धी योजनेअंतर्गत नगरपरिषद कामठी व सामाजिक वनीकरण विभागाच्या संयुक्त विद्यमाने नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, कामठी येथे मंगळवारी वृक्षारोपण व फळझाडांच्या रोपांचे वितरण कार्यक्रम उत्साहात पार पडला.

सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी एन. आर. राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमाला वनपरिक्षेत्र अधिकारी नीलिमा तायडे, नगरपरिषद कामठीच्या आरोग्य अधिकारी डॉ. शबनम खानूनी, आशा सेविका विमल झंझाड, मेघा शेंडे व शिल्पा वैद्य यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच सामाजिक वनीकरण विभागाचे वनपाल कैलास जामगाडे, वनरक्षक विलास खापर्डे, वनरक्षक मुकेश गायकवाड तसेच नगरपरिषद कामठीचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. तसेच कन्या वन समृद्धी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी कन्यांना प्रत्येकी १० फळझाडांची रोपे भेटस्वरूपात वितरित करण्यात आली.

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येक नागरिकाने वृक्ष लागवड करून त्यांचे संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अधिकारी डॉ शबनम खाणुनी यांनी केली.

पर्यावरण संरक्षणाबरोबरच कन्यांच्या सर्वांगीण विकासाची जाणीव समाजात रुजविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम उत्स्फूर्त प्रतिसादात यशस्वीरीत्या पार पडला.

Popular Articles