spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

“खाकी वर्दीतील जिद्दीचा प्रवास: शक्तिकुमार टेंभुर्णे आता पोलीस उपनिरीक्षक!”

हंसराज,भंडारा नवेगाव बांध :- “स्वप्न पाहण्यापेक्षा ती पूर्ण करण्यासाठी घेतलेली मेहनत मोठी असते,” हे चांना कोडका (ता. अर्जुनी मोरगाव) येथील शक्तिकुमार शालीकराम टेंभुर्णे यांनी सिद्ध केले आहे. सन २०१० मध्ये राज्य राखीव पोलीस बलात (SRPF) शिपाई म्हणून भरती झालेल्या शक्तिकुमार यांनी नुकत्याच झालेल्या विभागीय पोलीस उपनिरीक्षक (PSI) परीक्षेत नेत्रदीपक यश मिळवून फौजदार पदाला गवसणी घातली आहे. त्यांची निवड SRPF गट १३, वडसा गडचिरोली येथे झाली आहे.

२०१० ते २०२५: यशाचा खडतर प्रवास लहानपणापासूनच देशसेवेची ओढ असलेल्या शक्तिकुमार यांनी २०१० मध्ये गोंदिया येथील SRPF गट १५ मध्ये आपली सेवा सुरू केली. कर्तव्यावर असतानाच त्यांनी अभ्यासात सातत्य ठेवले. २०२५ च्या विभागीय परीक्षेत त्यांनी लेखी व शारीरिक चाचणीत उत्तम गुण मिळवून आपली क्षमता सिद्ध केली. एका छोट्या खेड्यातून सुरू झालेला हा प्रवास आज पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंत पोहोचल्याने ग्रामीण भागातील तरुणांसाठी ते प्रेरणास्थान बनले आहेत.

वरिष्ठांकडून गौरव या यशाबद्दल SRPF गट १५ गोंदियाच्या समादेशक भाग्यश्री नवटके (IPS), पोलीस उपाधीक्षक सिंह, हिरपूरकर, पोलीस निरीक्षक मिश्रा व सर्व सहकाऱ्यांनी शक्तिकुमार यांचा सत्कार करून त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या

सुशिक्षित कौटुंबिक पार्श्वभूमी शक्तिकुमार यांचे शिक्षण एम.ए. (समाजशास्त्र) झाले असून त्यांचे मोठे भाऊ इंग्रजी विषयात पी.एच.डी. प्राप्त सहयोगी प्राध्यापक आहेत.

आपल्या यशाचे श्रेय त्यांनी आई-वडील, पत्नी, मोठे भाऊ, वहिनी आणि संपूर्ण ग्रामस्थांना दिले आहे. त्यांच्या या यशामुळे चांना कोडका/ नवेगाव बांध परिसरात आनंदाचे वातावरण आहे.

Popular Articles