spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

जैकी रावलानी यांची भंडारा जिल्हा नियोजन समितीवर विशेष निमंत्रित सदस्य म्हणून निवड

हंसराज, भंडारा :-  भंडारा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचे आराखडे तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ‘जिल्हा नियोजन समिती’वर (DPC) जैकी रावलानी यांची विशेष निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे जिल्ह्याच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळातून त्यांचे मोठ्या प्रमाणावर अभिनंदन केले जात आहे.

जिल्हा नियोजन समिती ही जिल्ह्याच्या प्रगतीची दिशा ठरवणारी एक अत्यंत महत्त्वपूर्ण समिती मानली जाते. जिल्ह्याचा विकास आराखडा तयार करणे आणि विविध विकासकामांचे नियोजन करणे ही या समितीची मुख्य जबाबदारी असते. अशा महत्त्वपूर्ण समितीवर जैकी  रावलानी यांची नियुक्ती झाल्याने, त्यांच्या दांडग्या अनुभवाचा फायदा जिल्ह्याच्या विकासकामांना निश्चितच होईल, असा विश्वास त्यांच्या समर्थकांनी व्यक्त केला आहे.

रावलानी यांच्या निवडीमुळे जिल्ह्यातील अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील आणि विकासकामांना अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा स्थानिक कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे. सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या रावलानी यांच्या या नवीन नियुक्तीबद्दल सर्वच स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Popular Articles