spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

एवढा पाऊस पडूनही महाराष्ट्राचं टेन्शन कायम!

पुणे :- जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत दडी मारुन बसलेल्या पावसाने जोरदार कमबॅक केलं आहे. हा कमबॅक एवढा जोरदार आहे की जुलैच्या पहिल्या सात दिवसांमध्ये झालेल्या पावसामुळे राज्यातील एकूण पाऊस आता सरासरीच्या श्रेणीत आला आहे. पण या सात दिवसांमध्ये जमा झालेले पाणी सांभाळून वापरणे अत्यावश्यक ठरणार आहे. कारण या कालावधीत ने राज्यातील 36 पैकी 18 जिल्ह्यांमध्ये तीव्र अतिरिक्त, सात जिल्ह्यांमध्ये अतिरिक्त, तर सात जिल्ह्यांमध्ये – सरासरी श्रेणीत पाऊस नोंदला गेला असला तरी आता येत्या आठवड्यांमध्ये पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता आहे. पण हे टेन्शन घेण्यासारखं असण्याचं कारण म्हणजे इथून पुढे पाऊस कमी होत जाणार आहे.

कुठे कसा पाऊस?

कोकण विभाग, तसेच मध्य महाराष्ट्रातील महाबळेश्वर, पुणे, सांगली, सातारा या केंद्रांवर 7 जुलैच्या सकाळी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत आत्ताच्या सरासरीहून अधिक पाऊस नोंदला गेला आहे. कोकण विभागातील जिल्ह्यांमध्ये सिंधुदुर्ग वगळता इतर जिल्ह्यांमध्ये अतिरिक्त किंवा तीव्र अतिरिक्त पावसाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्रात नाशिक, पुणे, सातारा या जिल्ह्यांमध्ये अतिरिक्त पाऊस नोंदला गेला. विदर्भात गोंदिया येथे अतिरिक्त पाऊस नोंदला गेला. मात्र, उर्वरित महाराष्ट्रात पावसाची तूट आहे, तर मोजक्या जिल्ह्यांमध्ये पाऊस सरासरीच्या श्रेणीत पडला आहे.

जुलैमध्ये पुढे काय?

जुलैमधील पावसाच्या चांगल्या सुरुवातीनंतर आता राज्यात सर्वदूर हलक्या पावसाचाच अंदाज वर्तवण्यात येत आहे. उत्तर कोकणात गुरुवारी, 9 जुलैला हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे. 11 जुलैपर्यंत हलक्या सरींची शक्यता असेल. दक्षिण कोकणात 9 जुलैपासून रायगड जिल्ह्यात हलक्या सरी असतील, तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात घाट परिसर वगळता इतरत्र फारसा पाऊस नाही. बुधवारपासून या जिल्ह्यांमध्ये हलक्या विरळ होण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रातून त्यामुळे महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर धडकणारे सध्याचे बळकट मान्सून वारे कमकुवत होण्याची शक्यता आहे. म्हणूनच हलक्या पावसाची शक्यता असेल,.

मान्सून वारे कमकुवत

अरबी समुद्रातील पश्चिम किनारपट्टीला समांतर असलेल्या हवेच्या कमी दाबाची दक्षिणोत्तर द्रोणीय स्थिती उथळ होईल. बंगालच्या उपसागरातील उंचीवरील हवेचे तीव्र तीव्र कमी दाब क्षेत्र उत्तर आणि वायव्येकडे मार्गक्रमण करत येत्या दोन दिवसांत दक्षिण राजस्थानमध्ये पोहण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातही 11 जुलैपर्यंत हलक्या सरींचा अंदाज असून विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल. मात्र, पावसाचा जोर हलका ते मध्यम स्वरूपाचाच असेल. मुंबईसह कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात 10 ते 19 जुलैपर्यंतच्या दहा दिवसांत पावसाची केवळ उघडीप असेल.

Popular Articles