– महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणास ऐतिहासिक पाऊल
– बचत, स्वावलंबन व रोजगाराला मिळणार चालना.
कन्हान :- महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वाव लंबी, सक्षम आणि वित्तीयदृष्ट्या सशक्त करण्याच्या उद्देशाने स्थाप न करण्यात आलेल्या यशस्वी महिला क्रेडिट को-ऑप रेटिव्ह सोसायटी लिमिटेड (यशस्वी महिला बँक) यां च्या पहिल्या शाखेचे भव्य उद्घाटन रविवार (दि.५) जुलै ला कांद्री-कन्हान येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. या ऐतिहासिक सोहळ्यास महिला, सामाजिक कार्यकर्ते, मान्यवर व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.
कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणुन नीलिमा बावने संस्थापक अध्यक्षा धरमपेठ महिला मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड नागपुर या उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते फीत कापुन शाखेचे उद्घाटन करण्यात आले. दीपप्रज्वलन व माता सरस्वती पूजना ने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा रूपाली प्रीतम बागडे यांनी स्वागतपर भाषणात सांगितले की, यशस्वी महिला बँक ही केवळ वित्तीय संस्था नसुन महिलांच्या आत्मविश्वास, स्वाभिमान व आर्थिक प्रगतीसाठी सक्षम व्यासपीठ आहे. महिलां मध्ये बचतीची सवय निर्माण करणे, पारदर्शक व सुलभ आर्थिक सेवा उपलब्ध करून देणे, स्वयंरोजगाराला प्रोत्साहन देणे आणि गरजु महिलांना आर्थिक आधार उपलब्ध करून देणे हे संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रमुख अतिथी नीलिमा बावने यांनी सहकार चळवळीचे महत्त्व अधोरेखित करत महिलांचे आर्थिक सक्षमीकरण हे कुटुंब, समाज आणि राष्ट्राच्या विकासाचे आधारस्तंभ असल्याचे सांगितले.
यशस्वी महिला बँकेच्या या लोककल्याणकारी उपक्रमाचे त्यां नी कौतुक करत संस्थेच्या उज्ज्वल भविष्यास शुभेच्छा दिल्या. यावेळी संचालक मंडळातील दीपाली पाखिडे, ज्योती मेश्राम, ज्योती संभोजी, नम्रता भालेराव, हितेश्री मेश्राम, मायादेवी शंभरकर आणि सीमा बागडे यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाला महिला उद्योजिका, बचत गटांच्या सदस्य, सामाजिक कार्यकर्ते , हितचिंतक तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी या उपक्रमाचे महिला आर्थिक विकास आणि सामाजिक उन्नतीसाठी महत्त्व पूर्ण पाऊल म्हणुन स्वागत केले. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन संस्थेचे संचालक मंडळ, सल्लागार मंडळ व सर्व सदस्य यांच्या सहकार्याने करण्यात आले. शेवटी उपस्थित मान्यवरांचे आभार मानण्यात आले तसेच सर्वांसाठी अल्पोपहार व भोजनाची व्यवस्था करण्यात आली.




