spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

मनपा विद्युत विभागामार्फत ४४ ठिकाणी हायमास्ट लावण्याचे काम प्रगतीपथावर

चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिका विद्युत विभागाच्या वतीने शहराच्या विविध भागात ‘जिल्हा खनिज प्रतिष्ठान’ (DMFT) अंतर्गत प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजना (सन २०२५-२६) अंतर्गत एकूण ४४ ठिकाणी ‘सोलर हायमास्ट’ (Solar Highmast) लावण्याचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. महापालिका प्रशासनाने या कामाला गती दिली असून, लवकरच हे सर्व ४४ हायमास्ट नागरिकांसाठी सुरू करण्यात येतील. या योजनेमुळे मुख्य चौक आणि परिसर रात्रीच्या वेळी प्रकाशमय होणार आहेत.

या सुविधेचे नागरिकांना होणारे फायदे (जागरुकता):

२४ तास प्रकाश आणि चोख सुरक्षा: रात्रीच्या वेळी चौकाचौकात पुरेसा प्रकाश राहणार असल्यामुळे महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षा अधिक मजबूत होईल. रात्रीच्या वेळी होणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा बसेल.

अपघातांना ब्रेक: अंधारामुळे रस्त्यांवर होणारे अपघात टळतील. वाहनचालकांना रस्ते स्पष्ट दिसल्याने रात्रीचा प्रवास सुकर आणि सुरक्षित होईल.

विजेची १००% बचत (पर्यावरणपूरक पाऊल): हे सर्व हायमास्ट सौर ऊर्जेवर (Solar Energy) चालणारे असल्याने महापालिकेच्या विजेच्या बिलात मोठी बचत होईल. तसेच कार्बन उत्सर्जन कमी होऊन पर्यावरणाचे रक्षण होईल.

लोडशेडिंग नाही – वीज पुरवठा खंडित झाला तरीही हे सोलर दिवे अखंड सुरू राहतील. यामुळे शहरात अंधाराचे साम्राज्य पसरणार नाही.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.