नागपूर :- राष्ट्रीय वृत्तपत्र नागपूर बाजार पत्रिकाच्या यशस्वी ११ वर्षांच्या प्रवासानिमित्त भव्य सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर ११ व्या वर्धापनदिनानिमित्त केक कापून उत्सव साजरा करण्यात आला. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणवंत व्यक्तींचा सन्मान करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून समाजसेविका वृंदा ठाकरे, शाहू गार्डन स्कूलचे अध्यक्ष उमेश शाहू, विदर्भ की बातचे संपादक अतुल कोटेजा, पावन ऑफ वनचे संपादक नीरज श्रीवास्तव, जनक्रांती वार्ताचे संपादक जावेद पठाण तसेच भारतीय रिअल इस्टेटचे अध्यक्ष राजवीर सिंह यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन समाजसेवक प्रशांत भगत यांनी केले.

यावेळी नारी शक्ती सन्मान, ज्येष्ठ नागरिक सन्मान, विद्यार्थी सन्मान, नागपूर रत्न पुरस्कार तसेच बिझनेस रत्न पुरस्कार प्रदान करून विविध क्षेत्रांत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात आला.
सन्मानित व उपस्थित मान्यवरांमध्ये डॉ. हेमलता मिश्रा, रेखा मिश्रा, खुशी मिश्रा, रश्मी मिश्रा, लक्ष्मी वर्मा, प्रतिभा, मनीषा हटवार, गुंजन जाडे, समीक्षा परधी, आशीष गजबिये, अंजली रेड्डी, क्षिप्रा चौहान, अबीर चौहान, निशिकांत वाघमारे, मोनल पाल, अकुल बुधोलिया, चिन्मय, देवश्री ढोले, रविंद्र ढोले, माधुरी ढोले, विनया मूर्ती, शार्रिका गजबिये, शुभांगी गजबिये, राजीव कुमार, रामदास कैथवास, गणेश बिल्ला, शुभा बिल्ला, शरयू बिल्ला, अंजू पांडे, सारिका त्रिपाठी, धनेश्वरी त्रिपाठी, निष्ठा त्रिपाठी, लेखिका रीमा चड्ढा, अपूर्वा पाठक, प्रताप काशीकर, सुषमा शर्मा, सुजाता दुबे, दीप्ती तिवारी, अजय, शिवराज बैंगणे, मीनाक्षी धुडाडे, प्रज्ञा पाठक, पूनम पाठक यांच्यासह मोठ्या संख्येने मान्यवर नागरिक उपस्थित होते. यावेळी संस्थापक अध्यक्षा ज्योती द्विवेदी यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “नागपूर बाजार पत्रिकेचा ११ वर्षांचा प्रवास हा समाजाने दिलेल्या विश्वास, सहकार्य आणि निष्पक्ष पत्रकारितेचा सन्मान आहे. समाजहित, सत्यनिष्ठ पत्रकारिता आणि जनसामान्यांच्या प्रश्नांना न्याय देण्याचा आमचा संकल्प यापुढेही अधिक दृढ राहील.” कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा गौरव यामुळे हा सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. उपस्थितांनी नागपूर बाजार पत्रिकेच्या आगामी वाटचालीस शुभेच्छा देत संस्थेच्या सामाजिक व पत्रकारितेतील योगदानाचे कौतुक केले.




