spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

क्षेत्राच्या विकासात राजेंद्र जैन व अविनाश ब्राह्मणकर यांची भूमिका महत्त्वाची ठरणार – खा. प्रफुल पटेल

– भंडारा येथे दोन्ही लोकप्रतिनिधींचा जंगी नागरी सत्कार संपन्न

हंसराज, भंडारा :- “केंद्रात आणि राज्यात महायुतीचे ‘डबल इंजिन’ सरकार असून या माध्यमातून विकासाला मोठी गती मिळाली आहे. राज्यातील शेतकरी, कष्टकरी आणि महिलांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे आहे. महायुतीने राजेंद्र जैन यांना राज्यसभा तर अविनाश ब्राह्मणकर यांना विधान परिषदेत संधी देऊन विदर्भाचा सन्मान केला आहे. या दोन्ही  लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून गोंदिया-भंडारा जिल्ह्यासह पूर्व विदर्भाच्या सर्वांगीण विकासाला मोठी गती मिळेल,” असे प्रतिपादन खासदार प्रफुल पटेल यांनी केले.

भंडारा येथील लक्ष्मी सभागृहात महायुती सत्कार समितीच्या वतीने राज्यसभेचे नवनिर्वाचित खासदार राजेंद्र जैन व विधान परिषदेचे आमदार अविनाश ब्राह्मणकर यांच्या जाहीर सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या  अध्यक्षस्थानावरून खा. प्रफुल पटेल बोलत होते.

या सोहळ्याचे उद्घाटन राज्याचे महसूल मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुले यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आमदार डॉ. पंकज भोयर, आमदार डॉ. परिणय फुके, माजी मंत्री आमदार राजकुमार बडोले, आमदार विजय रहांगडाले, आमदार नरेंद्र भोंडेकर, आमदार राजूभाऊ कारेमोरे, आमदार संजय पुराम, वीरेंद्र अंजनकर, लायकराम भेंडारकर, सुनील फुंडे, धनंजय दलाल यांच्यासह महायुतीचे अनेक वरिष्ठ नेते उपस्थित  होते.

आपल्या भाषणात खा. पटेल पुढे म्हणाले की, “शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी सरकारने कर्जमुक्ती योजनेची प्रभावी अंमलबजावणी केली आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणीत धावून जाणारे हे सरकार आहे. राजेंद्र जैन आणि अविनाश  ब्राह्मणकर यांच्या रूपाने जनतेला दोन कार्यक्षम नेतृत्व मिळाले असून, त्यांच्या अनुभवाचा फायदा या क्षेत्राच्या विकासासाठी निश्चितपणे होईल.”

या सत्कार सोहळ्याला भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील महायुतीचे पदाधिकारी, विविध आघाड्यांचे कार्यकर्ते, सेल प्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन महायुती सत्कार समितीच्या वतीने करण्यात आले होते.सत्कारार्थी दोन्ही नेत्यांनी आपल्या सत्काराला उत्तर देताना, जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ न देता विकासकामे पूर्ण करण्याचा संकल्प व्यक्त केला.

Popular Articles