spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

– १४ जुलै रोजी दक्षिण नागपुरातील पाच ठिकाणी स्कॅनिंग कॅम्प; मोफत आरोग्य तपासणीचा लाभ घेण्याचे आवाहन

नागपूर :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित महाआरोग्य शिबिराअंतर्गत पश्चिम नागपूर, दक्षिण-पश्चिम नागपूर आणि दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघात सुरू असलेल्या मोफत स्कॅनिंग कॅम्पला नागरिकांचा दिवसेंदिवस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि दक्षिण नागपूरचे आमदार मोहन माते यांच्या मार्गदर्शनाखाली माजी आमदार तथा माजी महापौर संदीप जोशी यांच्या संयोजनातून हा उपक्रम राबविण्यात येत असून नागरिकांना अत्याधुनिक वैद्यकीय तपासणी, तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन तसेच आवश्यक उपचारांसाठी पुढील सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत.

आज पश्चिम नागपुरातील हनुमान मंदिर/अग्रसेन भवन (तेलंगखेडी) तसेच दक्षिण नागपुरातील योगभवन (महालक्ष्मी नगर), गजानन महाराज मंदिर (बालाजी नगर), सार्वजनिक हनुमान मंदिर, विरंगुळा केंद्र (वैभव नगर), डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम लायब्ररी (सोमवारी क्वार्टर) आणि सिद्धेश्वर सभागृह (मानेवाडा रोड) येथे आयोजित स्कॅनिंग कॅम्पमध्ये मोठ्या संख्येने नागरिकांनी विविध वैद्यकीय तपासण्यांचा लाभ घेतला. तपासणीनंतर पुढील उपचार अथवा शस्त्रक्रियेची आवश्यकता असलेल्या रुग्णांची आवश्यक वैद्यकीय प्रक्रिया वेगाने पूर्ण करून त्यांना पुढील उपचारासाठी मार्गदर्शन करण्यात येत आहे.

दि. १४ जुलै रोजी दक्षिण नागपुरात पुढील पाच ठिकाणी स्कॅनिंग कॅम्प आयोजित करण्यात आले आहेत :

– महालक्ष्मी सभागृह (चंडिका नगर, बसा रोड)

– रमणा मारुती मंदिर समाजभवन

– पुरातन झिऱ्याचा मारुती मंदिर (चंदन नगर)

– शितला माता मंदिर (सोनझरी नगर)

– सक्करदरा आदर्श गृहनिर्माण सोसायटी हॉल (चक्रधर नगर)

महाआरोग्य शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी संयोजक संदीप जोशी, सहसंयोजक रितेश गावंडे, विनोद कन्हेरे व रितेश पांडे यांच्यासह सर्व मंडळ अध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते, डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी आणि स्वयंसेवक विशेष परिश्रम घेत आहेत.

या मोफत आरोग्य उपक्रमाचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजक संदीप जोशी तसेच सहसंयोजक रितेश गावंडे, विनोद कन्हेरे आणि रितेश पांडे यांनी केले आहे.

Popular Articles