spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

29 जुलै ऐवजी 19 जुलैलाच 100% पूर्ण करणार ग्रामपंचायत येसंबाचे एसआयआर चे काम: बीएलओ व आशावर्कर सुषमा संजय गजभिये 

किशोर साहू, मौदा :- सगळीकडे मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनर्निरीक्षण (एसआयआर) चे काम 30 जून पासून सुरू असून 29 जुलै पर्यंत सुरू राहणार आहे. ग्रामपंचायत येसंबा येथे उपसरपंच धनराज हारोडे यांच्या मार्गदर्शनात, बीएलओ व आशा वर्कर सुषमा संजय गजभिये हे युद्ध स्तरावर एसआयआर चे काम करीत आहे. 12 जुलैला त्यांचे एसआयआर चे काम 50 टक्के च्या वर झाल्याचे त्यांनी वार्तालाप करताना सांगितले व 29 जुलै ऐवजी 19 जुलै पर्यंतच ग्रामपंचायत येसंबाचे एसआयआर चे काम 100% पूर्ण करणार असल्याचे ठामपणे त्यांनी सांगितले.

ग्रामपंचायत येसंबा येथील बीएलओ सुषमा गजभिये यांना त्यांच्या कामात मतदारांच्या घरोघरी जाण्यासाठी व मतदारांना वारंवार संपर्क करण्यासाठी गावचे पोलीस पाटील नरेंद्र राऊत, ग्रामपंचायत कर्मचारी संजय गजभिये, जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका माधुरी झाडे युद्धस्तरावर मदत करीत आहेत, हे विशेष !


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.