spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

अवैध पानठेले, अतिक्रमणावर मनपासह पोलीस करणार संयुक्त कारवाई

– पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील अन् मनपा आयुक्त डॉ. विपीन यांनी घेतली संयुक्त बैठक

नागपूर :- शाळ, महाविद्यालय यांच्या १०० मीटर परिघात असणाऱ्या अवैद्य पानठेले आणि अतिक्रमणावर नागपूर महानगरपालिका आणि नागपूर शहर पोलीस संयुक्तरित्या कडक कारवाई करावी असे निर्देश पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील यांनी दिले.

शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तीसह अतिक्रमण निर्मुलन आदी विषयांवर मनपा आयुक्त डॉ. विपीन आणि पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील यांनी पोलीस व मनपाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेतली. याप्रसंगी सह पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, मनपाचे अतिरिक्त आयुक्त मिलिंद मेश्राम, उपायुक्त मंगेश खवले, यांच्यासह सर्व सहायक आयुक्त, पोलीस विभागाचे सर्व उपायुक्त प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील यांनी सांगितले की, नागपूर हे देशाचे मध्यवर्ती स्थान आहे. विविध शहरातून विद्यार्थी शहरात शिक्षणासाठी येतात अशात शहरात अनेक असे अवैध पानठेले आहेत, ज्याठिकाणी अवैधपणे ड्रग्स, सिगारेट, ,मद्यविक्री केली जाते, अशा सर्व अवैध ठिकाणी पोलीस आणि मनपाने संयुक्त कारवाई करावी, तसेच ज्या ठिकाणी अवैधरीत्या ड्रग्स, सिगारेट, मद्यविक्री होत आहे अशा ठिकाणांची गय केल्या जाऊ नये, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

मनपा आयुक्त डॉ. विपीन यांनी शहरातील पदपथांवरील अतिक्रमण हटवून पादचान्यांसाठी सुरक्षित व मोकळे मार्ग निर्माण व्हावा आणि शहरी शिस्त प्रस्थापित होऊन नागरिकांच्या जीवनमान अधिक उंचवावे याकरिता नागपूर महानगरपालिका द्वारे राबविण्यात येत असलेल्या ‘मिशन १०० डे’ ची संपूर्ण माहिती पोलीस आयुक्तांना दिली. त्यांनी सांगितले की, मिशन १०० डे अंतर्गत मनपा, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस विभाग, नागपूर सुधार प्रन्यास, एनएचएआय, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या समन्वयने शहराला अतिक्रमण मुक्त करण्यासाठी कार्य केले जात आहे.

Popular Articles