spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

‘रघुपती राघव राजाराम’ सत्याग्रह आंदोलनास भंडारा शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद

हंसराज, भंडारा :- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज “रघुपती राघव राजाराम” सत्याग्रह आंदोलन” मोठ्या उत्साहात, शिस्तबद्ध व शांततापूर्ण वातावरणात पार पडले. या आंदोलनाला काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.

कार्यक्रमाची सुरुवात जलाराम चौक येथील हनुमान मंदिरात “रघुपती राघव राजाराम” भजनाने करण्यात आली. त्यानंतर सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जलाराम चौक ते गांधी चौक अशी पदयात्रा काढत जोरदार घोषणाबाजी केली.

“रामाच्या नावाने जमा झालेल्या देणग्यांचा हिशोब द्या”, “श्रद्धेचा सन्मान करा – पारदर्शकता आणा”, “राम सर्वांचे आहेत, कोणाच्याही मालकीचे नाहीत”, “भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा विजय असो”, “सत्याग्रहाचा विजय असो” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.

गांधी चौक येथे भजन, प्रार्थना व सत्याग्रह करण्यात आला. त्यानंतर सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भंडारा शहर पोलीस स्टेशनमध्ये निवेदन सादर करून श्रीराम मंदिर ट्रस्टच्या आर्थिक व्यवहारांबाबत उपस्थित झालेल्या प्रश्नांची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली.

यावेळी भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रशांत पडोळे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “प्रभू श्रीराम हे संपूर्ण देशाच्या श्रद्धेचे दैवत आहेत. त्यामुळे भक्तांनी अर्पण केलेल्या प्रत्येक देणगीचा पारदर्शक हिशोब जनतेसमोर ठेवला गेला पाहिजे. श्रद्धेवर कोणताही संशय निर्माण होणार नाही, यासाठी संपूर्ण पारदर्शकता आवश्यक आहे.”

माजी जिल्हा परिषद सभापती रमेश पारधी यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “हा लढा कोणत्याही धर्माच्या विरोधातील नाही, तर श्रद्धेच्या सन्मानासाठी आहे. सत्य जनतेसमोर यावे आणि दोषींवर कायद्यानुसार कारवाई व्हावी, हीच आमची भूमिका आहे.”

साकोली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक कापगते यांनी सांगितले की, “सत्याग्रह हा काँग्रेस पक्षाचा विचार आहे. आम्ही शांततेच्या मार्गाने सत्य, पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाची मागणी करत आहोत.”

यावेळी भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मुकुंद साखरकर यांनी आपल्या भाषणात केंद्र सरकारवर टीका करताना सांगितले की, “देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःला देशाचा चौकीदार म्हणून सादर केले. मात्र आज श्रीराम मंदिर ट्रस्टच्या आर्थिक व्यवहारांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत असताना केंद्र सरकार मौन का बाळगत आहे, हा देशातील प्रत्येक रामभक्ताचा प्रश्न आहे. प्रभू श्रीरामांच्या नावाने मते मागून सत्ता मिळवली; आता श्रीरामांच्या नावाने भक्तांनी दिलेल्या देणग्यांचा संपूर्ण हिशोब देशासमोर ठेवण्याची वेळ आली आहे. जर सर्व व्यवहार पारदर्शक असतील, तर स्वतंत्र चौकशी आणि श्वेतपत्रिका जाहीर करण्यास सरकारने कोणतीही हरकत नसावी. आम्ही कोणाच्याही श्रद्धेच्या विरोधात नाही, तर श्रद्धेच्या सन्मानासाठी आणि पारदर्शकतेसाठी हा सत्याग्रह करीत आहोत.

यावेळी मुकुंद साखरकर, खासदार प्रशांत पडोळे, जिया पटेल, जय डोंगरे, विकास राऊत, प्रेम वणवे, प्यारेलाल वाघमारे, धनराज साठवणे, शंकर तेलमासरे, धर्मेंद्र नांदरधने, प्रमोद कटरे, राजेश हटवार, मंगेश हुमणे, नरेंद्र साकुरे, पराग सुखदेवे, रमेश पारधी, अय्युब पटेल, सुरेश मेश्राम, नवाब पटेल, किशोर राऊत, टेकचंद मारबते, मनोहर उरकुडकर, प्रमोद तितीरमारे, मनोहर देशमुख, राहुल सावरबांधे, स्वाती वाघाये, गोपाल पंचभाई, रिजवान काजी, जीवन कावळे, आकाश ठवकर, किशन शेंडे, विपीन बोरकर, राजकुमार लोखंडे, अनिता भुरे, कमल साठवणे, सदानंद धारगावे, रोहित खोब्रागडे, अक्षत नांदरधने, रिजवान शेख, जनार्दन निंबार्ते, अवंती राऊत, अजित खोब्रागडे, किशोर भोयर, भगवान नवघरे, कमलाकर रायपूरकर, राकेश बिसने, राजेंद्र रायपूरकर, आवेश रायपूरकर, महेश बिसने, भाऊ कातोरे, दिलीप मडामे, संजय बांते, अनिल बावनकुळे, अनिल दलाल, अशोक कापगते, पृथ्वी तांडेकर, कुसुम कांबळे, मीना जिभकाटे, निशा सोनकुसरे, ललिता खाडेकर, मीरा उरकुडकर, वनिता सयाम, माधुरी ठाकरे, मुक्ता चव्हाण, ताराबाई नागपुरे, अर्चना नागपुरे, चानदास शेंडे, विजय शहारे, अशपाक अली, सुरेश खंगार, शाहीन मुन, चांद डोंगरे, सचिन फाले, रामचंद्र पाटील, विलास घवळे, वैभव मेंढे, हिरामण लांजेवार, रणवीर भगत, भूपेंद्र साठवणे, संदेश श्यामकुवर, अमरकंठ बांडेबुचे, श्रीधर ठोंबरे, नंदलाल उईके, अतुल शिंगाडे, प्रतीक रामटेके, अंकुश मेश्राम, नाहीद खान, मुन्ना भोंगडे, भावेश नागपुरे, पवन मस्के, फजल पटेल, आसिफ जमील, शुभम गभणे, गणेश लिमजे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, विविध आघाडी-सेलचे कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.