spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

सेठ केसरिमल पोरवाल महाविद्यालयात उत्साहात प्रवेशोत्सव साजरा

कामठी :- सेठ केसरिमल पोरवाल महाविद्यालयात नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण वातावरणात प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. स्वप्नील दहाट यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्युनिअर महाविद्यालयाचे उपप्राचार्य व्ही. बी. वंजारी हे होते. प्रमुख उपस्थितीमध्ये पर्यवेक्षक एन. डी. मेंढे यांची उपस्थिती लाभली.

यावेळी विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांना महाविद्यालयातील शैक्षणिक, सांस्कृतिक व व्यक्तिमत्त्व विकासाच्या विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली. नवीन विद्यार्थ्यांनी नियमित उपस्थिती, शिस्त, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि महाविद्यालयाच्या उज्ज्वल परंपरेचे जतन करण्याचे आवाहन मान्यवरांनी केले.

कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन एस. वासनिक तसेच आशीष क्षिरसागर यांनी केले, तर कार्यक्रमाचे संयोजन एल. डी. मासुरकर यांनी केले.

या प्रसंगी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.

Popular Articles