spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

शहर व ग्रामीण मध्ये सुरक्षेसाठी पोलिस चौकी, वाढीव गस्त व प्रभावी कायदा-सुव्यवस्थेची मागणी

कन्हान :- शहर व परिसरातील ग्रामीण भागात वाढ त्या चो-या, घरफोडी व इतर गुन्हेगारी घटनांच्या पार्श्व भूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याच अनुषंगाने कन्हान काँग्रेस पक्षाच्या वतीने पोलिस उपविभागीय अधिकारी व पोलिस निरीक्षक, कन्हान यांचे कडे शहर व ग्रामीण भागातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्याची मागणी करण्यात आली.

पोलिस उपविभागीय अधिकारी व पोलिस निरीक्षक कन्हान हयांनी कन्हान शहर व ग्रामीण भागा तील सुरक्षा व्यवस्था बळकट करण्यात यावी. गांधी चौक, तारसा रोड चौक, गहुहिवरा चौक, सात नंबर नाका तसेच संवेदनशील ग्रामीण भागात कायम स्वरू पी पोलिस चौक्या उभाराव्यात, नियमित व वाढीव पोलिस गस्त ठेवावी, रात्रीची गस्त अधिक प्रभावी करा वी तसेच आवश्यक ठिकाणी सीसीटीव्ही देखरेख व पोलिस प्रतिसाद यंत्रणा मजबुत करण्याची मागणी करण्यात आली. शहरातील व्यापारी, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामीण भागातील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्या साठी आणि गुन्हेगारांवर कायद्याचा वचक निर्माण करण्यासाठी तातडीने ठोस उपाययोजना करून गुन्हे गारीवर प्रभावी नियंत्रण मिळवावे व नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करावी, अशी अपेक्षा काँग्रेसच्या वतीने व्यक्त करित मागणी काँग्रेस जेष्ठ नेते नरेश बर्वे, चंद्रशेखर पडोळे, योगेश (बाबु) रंगारी, मनिष भिवगडे, प्रशांत बाजीराव मसार, रेखा टोहणे, निती तेलोते, राखी परते, दर्शना तिडके, वंदना बागडे, योगराज अवसरे,प्रविण गोडे, सतिश भसारकर, कमलेश मेश्राम, शेखर बोरकर, शुभम चहांदे, विनय यादव, गणेश भालेकर, गौरव माहोरे, अर्जुन पात्रे, समशेर पुरवले, मोहसीन खान, गौतम नितनवरे, प्रदीप बावणे, संदीप परते आदी सह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यक र्त्यानी केली आहे.

Popular Articles