नागपूर :- महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या वतीने दहावी व बारावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार समारंभ शनिवार, १९ जुलै रोजी सकाळी ११ वाजता सामाजिक न्याय भवन सभागृह, दीक्षाभूमी रोड, नागपूर येथे आयोजित करण्यात आला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांसह यूपीएससी व एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचाही गौरव करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशाचा सन्मान करून त्यांना पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहन देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते होणार असून, शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोंयर प्रमुख उपस्थित राहणार आहेत. प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व अपर पोलीस आयुक्त विनिता साहू उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कामगार नेते अरुण गाडे राहणार असून, विशेष अतिथी म्हणून डॉ. राजाभाऊ टाकसाळे उपस्थित राहतील. तसेच समाजकल्याण, आरोग्य, शिक्षण व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाने सर्व गुणवंत विद्यार्थी,पालक, सदस्य व नागरिकांनी या प्रेरणादायी सत्कार समारंभास मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन केले जात आहे.








