हंसराज,भंडारा :- “महाराष्ट्रातील सध्याची राजकीय परिस्थिती लवकरच बदलणार असून, भविष्यातील बदलांसाठी शिवसैनिकांनी सज्ज राहावे. जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी आपला जनसंपर्क वाढवा,” असे आवाहन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, आमदार अंबादास दानवे यांनी भंडाऱ्यात केले.
नागपूर येथे आयोजित ‘रामरक्षा’ आंदोलनाच्या निमित्ताने आमदार दानवे भंडाऱ्यात आले असता, सर्किट हाऊस येथे आयोजित जिल्हा पदाधिकारी बैठकीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशीही संवाद साधला.
‘गेलेले कावळे, राहिलेले तेच खरे मावळे’ – संजय रेहपाडे यावेळी प्रास्ताविक भाषणात जिल्हाप्रमुख संजय रेहपाडे यांनी जिल्ह्याचा आढावा मांडला. ते म्हणाले की, “भंडारा जिल्ह्यात शिवसेनेतून जे सोडून गेले ते केवळ ‘कावळे’ होते, जे आजही निष्ठेने पक्षासोबत उभे आहेत तेच खरे ‘मावळे’ आहेत. जुन्या आणि नवीन शिवसैनिकांची योग्य सांगड घालून जिल्ह्यात ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या सूत्रानुसार पक्षबांधणी सुरू आहे. लवकरच ‘गाव तिथे शाखा आणि घर तिथे शिवसैनिक’ ही मोहीम राबवून शिवसेना जिल्ह्यात अधिक मजबूत करू.”
जनता गद्दारांना ओळखून आहे – अंबादास दानवे
आपल्या अध्यक्षीय भाषणात दानवे पुढे म्हणाले, “सत्ताधाऱ्यांनी कितीही पैसा ओतला तरी जनता त्यांना ओळखून आहे. उद्धव ठाकरेच शेतकरी आणि बेरोजगारांना न्याय देऊ शकतात, हा विश्वास जनतेच्या मनात आहे.
ज्यांनी काही ‘खोक्यांसाठी’ गद्दारी केली, तो भूतकाळ विसरून नव्या जोमाने कामाला लागा.” येत्या शनिवारी नागपूरच्या रामनगर भागात होणाऱ्या रामरक्षा आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
या बैठकीला जिल्हाप्रमुख संजय रेहपाडे, लवकुश निर्माण, सुधाकर कारेमोरे, किशोर तलमले, किशोर चन्ने, प्रकाश पारधी,शोभाराम तिजारे, युवा सेना जिल्हा अधिकारी श्रीकांत मेश्राम, तिलक सार्व्हे, राकेश आग्रे, दिनेश नंदपुरे , ईश्वर भोयर, मधु बुराडे , ज्ञानेश्वर बावनकर,अरविंद अंबादे, होमराज उपरीकर , निवृत्ती गभने, भोला शेंडे , भास्कर बेदरकर , निलेश चामट, मयूर जोशी, प्रशांत देशमुख, चित्रागंध सेलोकर , प्रकाश गभणे, अतुल मिरासे ,सोमेश्वर सेलोकर , राजेश नान्हे, महिपाल वहिले, अनिल माहुले, दिलीप शिंगाडे, सत्यनारायण कामथे, राकेश क्षीरसागर, शैलेश खोब्रागडे, रोहित बनसोड ,कैलास कावळे, गोवर्धन मारवाडे, राजेश ठवकर, सुखराम बडवाईक, लखिंदर सोनी , ज्ञानेश्वर मते, मीताराम जीभकाटे , राजू लांजेवार, तुळशीदास मेश्राम, सुनील सोमनाथे,हनुमान शेंडे, भास्कर बेदरकर, प्रदीप नेवारे, ईश्वर टाले, हर्षल टेम्भूरकर, निखिल कुंभारे, प्रवीण गायधने,अनिल इखार, विशाल भुरे, विलास बुराडे , शारीख शेख, पवन खवास, शुभम सोनटक्के, नरेंद्र शेंडे ,संतोष चांदेवार, भोजराज भेंडारकर, देविदास शेंडे, दलिराम भुते, जयपाल राऊत, नरेंद्र नान्हे, शामराव मालखंडाळे , बालकदास परतेती, अनिरुद्ध गाढवे, प्रदीप घोडीचोर, आकाश मेश्राम, परमानंद राहांगडाले, संतोष कुथे, प्रवीण नवखरे, इम्रान शेख, नयन शेंद्रे, प्रकाश साठवणे इत्यादी अनेक पदाधिकारी उपस्थित होते








