spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

‘चलो संसद’ आंदोलनासाठी भंडाऱ्यातील विद्यार्थ्यांची दिल्लीकडे रवाना; AISF च्या नेतृत्वात मोठा सहभाग

हंसराज भंडारा :- पर्यावरणवादी व सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी दिलेल्या ‘चलो संसद’ या हाकेला प्रतिसाद देत, भंडारा जिल्ह्यातील शेकडो विद्यार्थी आणि युवक दिल्लीतील जंतर-मंतरवर होणाऱ्या आंदोलनासाठी रवाना होत आहेत. ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन  (AISF) च्या माध्यमातून हा लढा अधिक तीव्र करण्यात येत असून, जिल्ह्याचे नाव राष्ट्रीय स्तरावर गाजत आहे.

दिल्ली येथील जंतर-मंतरवर सध्या अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या आंदोलनाला देशभर पाठिंबा मिळत आहे. याचे पडसाद भंडारा जिल्ह्यातही उमटले असून, AISF चे माजी जिल्हाध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याध्यक्ष कॉ. वैभव चोपकर यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांची मोठी फळी या आंदोलनात सक्रिय झाली आहे. कॉ. चोपकर यांनी स्वतः पाच दिवस जंतर-मंतरवरील आंदोलनात सहभागी होऊन विद्यार्थी आणि  तरुणांच्या प्रश्नांना राष्ट्रीय व्यासपीठावर वाचा फोडली आहे.

सोनम वांगचुक यांच्या आवाहनानुसार, २० जुलै २०२६ रोजी कॉ. वैभव चोपकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांचा जत्था दिल्लीकडे प्रस्थान करणार आहे. यामध्ये भंडारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग असून, उद्या पहिल्या टप्प्यातील विद्यार्थी दिल्लीसाठी रवाना होतील. त्यानंतर दुसऱ्या दिवशी AISF भंडारा टीमच्या वतीने विद्यार्थ्यांची दुसरी तुकडी दिल्लीकडे कूच करेल.

विद्यार्थी, युवक आणि लोकशाही हक्कांच्या संरक्षणासाठी देशभर उभ्या राहिलेल्या या आंदोलनाला भंडाऱ्यातून मिळणारा प्रतिसाद लक्षवेधी ठरत आहे. “विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी आणि जनतेच्या न्याय्य मागण्यांसाठी हा संघर्ष यापुढेही अधिक व्यापक केला जाईल,” असा निर्धार AISF संघटनेने व्यक्त केला आहे.

Popular Articles