spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

पुण्यात जप्त केलेल्या 6 कोटींच्या ड्रग्स रॅकेटचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन

पुणे :- पुण्यातील कात्रज परिसरातून तब्बल 5 कोटी 79 लाख रुपयांचे मेफेड्रॉन (एमडी) ड्रग्ज जप्त केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीने हा अमली पदार्थ दिल्लीहून आणल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आलीय. बेनी नावाच्या नायजेरियन महिलेच्या सांगण्यावरून हा ड्रग्जचा साठा बंगळुरूत पोहोचविण्यासाठी निघालेला असताना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने कात्रज येथे सापळा रचून त्याला पकडले.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रशांत सुरेश सावंत (38) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून पोलिसांनी 2 किलो 895 ग्रॅम मेफेड्रॉन, एक मोबाईल आणि एक बॅग असा एकूण 5 कोटी 79 लाख 10 हजार 250 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर एमडी साठा जप्त केल्यावर हे प्रकरण एका मोठ्या नेटवर्कचे असल्याचा अंदाज येताच पोलिसांनी आंतरराज्यीय आणि आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटची साखळी उलगडण्यासाठी आरोपीला दिल्ली येथे नेलं. तपासादरम्यान, आरोपी ने हे एमडी नायजेरियाच्या बेनी नामक महिलेने सांगितलेल्या पत्त्यावरून आणल्याचं निष्पन्न झालं आहे.

ही “बेनी” नेमकी आहे तरी कोण?

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने सावंत याच्याकडून जवळपास 6 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करताच हे आंतरराष्ट्रीय रॅकेट असल्याचा संशय येताच आरोपिकडे कसून चौकशी करायला सुरुवात केली. आरोपी सावंत याची नायजेरियन महिला ‘बेनी’ हिच्याशी ओळख होती. बेनी सावंतशी मोबाईल वरून संपर्क साधायची आणि अमली पदार्थ कोणाकडून घ्यायचे आणि कोणाला द्यायचे याच्या सूचना करत असे. काही दिवसांपूर्वी मूळ पुण्यातील येरवडा भागातील राहणारा सावंतला बेनीचा फोन आला. ‘दिल्लीला जायचं, सांगेल त्या ठिकाणी एक बॅग असेल ती उचलायची आणि बंगलोरमध्ये जाऊन द्यायची आहे’ अशा सूचना दिल्या. त्यानुसार सावंत दिल्लीत पोहचला, त्याला मोबाईल वर एक पत्ता आला. एका जंगल सारख्या निर्मनुष्य ठिकाणी तो पोहचला, तिथे असलेली बॅग उचलली आणि निमूटपणे निघाला. बेनी ने दिलेल्या सूचनांनुसार ती बॅग त्याला बंगळुरू मध्ये द्यायची होती. दिल्लीवरून बंगलोर ची बस न घेता त्याने पुण्याची बस पकडली. पुण्यातील कात्रज भागात बस थांबली, खाली उतरताच सावंतचे पोलिसांनी ‘स्वागत’ केलं आणि थेट कोठडीत नेलं.

गोल्फ कोर्सचा हमाल ते अमली पदार्थांचा दलाल

सावंत हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर बंगळुरू सह पुण्यातील विश्रांतवाडी, विमानतळ, येरवडा यासारख्या पोलिस ठाण्यात एकूण ९ गुन्हे दाखल आहेत. अमली पदार्थांची तस्करी करण्यापूर्वी सावंत “कॅडी” म्हणजेच गोल्फ कोर्स मध्ये हमाल म्हणून काम करत होता. गोल्फरच्या बॅग, क्लब आणि इतर साहित्य एका होलवरून दुसऱ्या होलवर घेऊन जाणे हे सावंत चे प्रमुख कामे असे. मात्र ही नोकरी सोडून त्याने अमली पदार्थांची तस्करी करायला सुरुवात केली.

Popular Articles