spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठेंना लहुजी शक्ती सेनेकडून विनम्र अभिवादन

नागपूर :- लोकशाहीर साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिना निमित्त लहुजी शक्ती सेने च्यावतीने त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या सामाजिक, साहित्यिक व परिवर्तनवादी कार्याला उजाळा देत त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला. या अभिवादन कार्यक्रमाला लहुजी शक्ती सेनेचे प्रदेश सचिव रविंद्र खडसे, नागपूर जिल्हाध्यक्ष अंकुश बावणे, नागपूर जिल्हा कार्याध्यक्ष रमेश पाडण, नागपूर शहराध्यक्ष सागर (दादा) जाधव, विदर्भ उपाध्यक्ष महेश खोडके, विदर्भ सरचिटणीस कृष्णा खोडके, प्रवीण डोंगरे, राज्य कार्यकारिणी सदस्या वानखेडे, नागपूर महिला शहराध्यक्षा जयश्री इंगोले, सोनू वानखेडे, इंदिरा वाघमारे यांच्यासह लहुजी शक्ती सेनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांनी डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचे स्मरण करून समाजातील वंचित, शोषित आणि उपेक्षित घटकांच्या न्यायहक्कासाठी त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन सामाजिक परिवर्तनासाठी कार्यरत राहण्याचा निर्धार व्यक्त केला.

Popular Articles