spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

नागपूर जिल्यातील शाळा उघडण्याच्या पहिल्याच दिवसापासुन दवाखाना आपल्या दारी च्या वैदयकिय चमुने केली शालेय विदयार्थ्याची आरोग्य तपासणी.

 

नागपूर २७ – जिल्हा खनिज प्रतिष्ठान मंजुर प्राप्त अनुदानातुन दवाखाना आपल्या दारी ही नाविण्यपुर्ण योजना राबविण्यात येत आहे.अशा प्रकारची योजना राबविणारा नागपूर एकमेव जिल्हा आहे. समाजातील वंचित आणि दुर्बल घटकांना गुणवत्तापुर्वक आरोग्य सेवांची उपलब्धता करुन देण्याच्या हेतुने हा कार्यक्रम जिल्हाधिकारी मा.डॉ.विपीन इटनकर  व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नागपूर विनायक महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली  जिल्हयात सुरु आहे.

 शासनाने आरोग्य विभागाला उद्देश पुर्तता करण्यासाठी गावपातळीवर विविध आरोग्य कार्यक्रम जसे माता व बाल संगोपन कार्यक्रम, असंसर्गजन्य आजार नियंत्रण कार्यक्रम, राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रम, राष्ट्रीय क्षयरोग निर्मुलन कार्यक्रम, राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम, राष्ट्रीय कुटुंब नियोजन कार्यक्रम, सिकलसेल नियंत्रण कार्यक्रम, सुरु असुन  ते आरोग्य यंत्रणे मार्फत गावात जाऊन वेगवेगळया वेळेस सर्वेक्षण करुन अथवा कॅम्प घेऊन केली जातात. या साठी आरोग्य कर्मचाऱ्यांना एकाच गावत विविध कार्यक्रमातंर्गत वारंवार जावे लागते. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर याचा ताण पडत असतो. त्यामुळे दवाखाना आपल्या दारी चा चमु हे विविध आरोग्य कार्यक्रम एकाच दिवशी गावात जाऊन राबवित आहेत त्यामुळे आरोग्य सेवा  अधिक प्रभावी व गुणवत्तापुर्ण ठरत असतांना दिसत आहे.

दिनांक 23 जुन रोजी शाळा सुरु झालेली असुन जिल्हयातील सर्व प्राथमिक शाळेतील विदयाथ्याची तपासणी करण्याबाबत कार्यवाही सुरु असुन आज पर्यत एकुण 282 ठिकाणी तपासणी शिबीरे घेण्यात आली असुन त्यात एकुण 17315 विदयार्थ्याची सांसर्गीक व असांसर्गीक आजाराची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे.आजारी व काही आजारची लक्षणे आढळलेल्या बालकाना तात्काळ औषधोपचार करण्यात येत असुन आवश्यकतेनुसार संदर्भसेवा देण्यात येत आहे.

नागपूर जिल्हयताील प्रत्येक शालेय बालकांची तपासणी या मोहिमअंतर्गत करण्याचा कृती आराखडा विनायक महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राजकुमार गहलोत , जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ.रेवती साबळे यांनी तयार केला आला असुन त्या पध्दतीने तपासणी पथक व देखरेख पथक कार्य करत आहे .

Popular Articles