– भजन हे ईश्वर भक्तीचे सर्वोत्तम माध्यम- प्रा अनिल सोले
– आमदार सांस्कृतिक महोत्सव समितीचे आषाढी निमित्त आयोजन
नागपूर :- आमदार सांस्कृतिक महोत्सव समिती मध्य नागपूर द्वारे आमदार प्रवीण दटके यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वाढदिवसाच्या निमित्ताने आणि आषाढ पर्वनिमित्ताने मध्य नागपूरातील १५६ वारकरी अभंग भजन मंडळींनी विठ्ठल भक्तीचा जागर केला. बुधवार २२ जुलै रोजी शिक्षक सहकारी बँक सभागृह, गांधीसागर महाल येथे सकाळी ८ वाजता स्पर्धेला सुरुवात झाली. भजन हे ईश्वर प्राप्तीचे सर्वोत्तम माध्यम हे भजन स्पर्धेद्वारे सुसंस्कृत समाज घडविण्याचे कार्य मातृशक्ती करतात असे गौरवोद्गार प्रा अनिल सोले यांनी काढले तर आमदार प्रवीण दटके यांनी उपक्रमाला शुभेच्छा दिल्यात.

ज्ञानेश्वरांचा हरिपाठ घेऊन स्पर्धेच उद्घाटन खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीचे अध्यक्ष व माजी आमदार अनिल सोले यांचे हस्ते करण्यात आले.तसेच प्रमुख अतिथी म्हणून समर्थ सेवा मंडळाच्या ज्येष्ठ भजन प्रचारक मोहिनी खोत, मध्य नागपूरचे आमदार प्रवीण दटके, योगेश बन, भोलानाथ सहारे, भाजप महिला आघाडी अध्यक्ष दिव्या धुरडे, सारिका नांदूरकर, वैशाली उदापुरकर आदी नगरसेवक उपस्थित होते.या स्पर्धेत मध्य नागपुरातील १५६ भजनी मंडळांनी सहभाग घेतला असून त्यातुन २१ उत्तम विजेत्यां भजनी मंडळांची महाअंतिम फेरी साठी निवड होणार आहे. स्पर्धेची अंतिम फेरी सोमवार दि २७ जुलै रोजी शिक्षक सहकारी बँक सभागृह महाल येथे सकाळी ११ ते ४ पर्यंत आयोजित असून संध्या ४.३० वाजता बक्षीस वितरण सोहळा महापौर नीता ठाकरे, स्थायी समिती अध्यक्ष शिवानी दाणी वाखरे, आदी मान्यवर अतिथींच्या उपस्थितीत संपन्न होईल. या स्पर्धेची संकल्पना आमदार प्रवीण दटके यांची असून स्पर्धेचे संयोजन डॉ श्रीरंग वराडपांडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सौ रेखा निमजे, श्वेता निकम, सुजाता कठवते, दर्शना नखते, मनीषा उंबरकर, धनश्री भोरकर, अभिजीत कथले, विवेक दुबे,आदिनी परिश्रम घेतले.








