spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज व राहुल गांधी यांच्या अटकेच्या निषेधार्थ कामठी नगर काँग्रेस कमिटीचे कामठी तहसील कार्यालय समोर निषेध मोर्चा

कामठी :- नगर काँग्रेस कमिटी, कामठीच्या वतीने केंद्र सरकार व दिल्ली पोलिसांकडून विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या कथित लाठीचार्जचा तसेच लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या अटकेचा निषेधार्थ कामठी विधानसभेचे नेते व कांग्रेस चे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सुरेश भोयर यांच्या नेतृत्वात कामठी नगर काँग्रेस कमिटीच्या वतीने कामठी तहसील कार्यालय समोर आज 11 वाजता तीव्र निषेध व्यक्त करण्यात आले.यावेळी तहसिलदार मार्फत राष्ट्रपती यांना सामूहिक निवेदन सादर करण्यात आले. सादर करण्यात आलेल्या निवेदनात देशातील वाढती बेरोजगारी, महागाई, शिक्षण क्षेत्रातील समस्या आणि NEET परीक्षेतील कथित पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेल्या असंतोषाचा उल्लेख करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर पोलिसांनी केलेल्या कथित लाठीमाराची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणीही निवेदनातून करण्यात आली.

यासोबतच, आंदोलनादरम्यान राहुल गांधी यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईचा निषेध नोंदवत लोकशाही व्यवस्थेत विरोधी पक्षाचा आवाज दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप काँग्रेसच्या वतीने करण्यात आला.

निवेदनाद्वारे विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, त्यांच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करावा आणि शिक्षण व्यवस्थेतील त्रुटी दूर करण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने ठोस पावले उचलावीत,तसेच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा व विद्यार्थ्यांच्या हिताचे रक्षण करावे अशी मागणी करण्यात आली.

निवेदन देतांना माजी जी प अध्यक्ष सुरेश भोयर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या महासचिव तक्षशीला वाघधरे यांच्यासह शांता कुंभरे, दिनेश ढोले, काशीनाथ प्रधान, धीरज यादव,अनंतावाघ,अहफाज अहमद, निरज लोणारे, इरशाद शेख,कुणाल इटकेलवार, किशोर धाडे,सरिता रंगारी,इशरत खान, कृष्णा यादव, राजेश बनसिंगे, कमलाकर मोहोड, अलंकार गजभिये, छत्रपाल करडभांजने, साजिद अंसारी, अनिल सुर्यवंशी, सातिका खांडेकर, मिर् आसिफ अली, ममता कांबळे,कल्याणी रामटेके, योगिनी खोब्रागड़े, नदीम अंसारी, मो. गुफरान, इमरान भाई, सुमेध रंगारी, चिंटूभाई, सुमित गेड़ाम, सत्यफुला खोब्रागड़े, साजिद कमाल अंसारी, रशीद अंसारी, शिल्पा शंभरकर, दिनु नागदेवे, ज्योति कारेमोरे, हरीश गजभिये, रोशनी भस्मे, हारून अंसारी, नटवर यादव, कुंडा कावले, आसिफ सिद्धिकी,मो. शफीक, अंजलि वासनिक, कृष्णा करडभांजने आदी उपस्थित होते.

Popular Articles