spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

मनपाविरुद्ध नव्याने दाखल झालेल्या न्यायालयीन प्रकरणांची माहिती उपलब्ध करावी

– विधी विशेष समिती सभापती निधी तेलगोटे यांचे निर्देश

 नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या विधी विशेष समितीची सभा सभापती  निधी तेलगोटे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (ता. 23) मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात पार पडली. यावेळी समितीच्या बैठकीत चर्चेअंती विविध विषयांना मंजुरी देण्यात आली. तसेच विधी विशेष समिती सभापती निधी तेलगोटे यांनी महानगरपालिकेविरुद्ध नव्याने दाखल झालेल्या न्यायालयीन प्रकरणांची आणि न्यायालयाकडून प्राप्त महत्त्त्वपूर्ण आदेशाची माहिती, प्रत्येक महिन्यात समितीपुढे सादर करण्याचे निर्देश दिले.

या बैठकीला उपसभापती ॲड. संजयकुमार बालपांडे, सदस्य धनश्री देशपांडे, शारदा बारई, ॲड. निलेश गायधने, ॲड. शैलेंद्र डोरले, पवन कोये यांच्यासह प्र. अतिरिक्त आयुक्त मिलिंद मेश्राम, उपायुक्त निर्भय जैन, सहायक आयुक्त श्याम कापसे, राजकुमार मेश्राम,  घनश्याम पंधरे, विधी अधिकारी सूरज पारोचे, माहिती तंत्रज्ञान अधिकारी स्वप्नील लोखंडे यांच्यासह मनपाचे इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी बैठकीत मनपाच्या संकेत स्थळावर न्यायालयीन प्रकरणांची माहिती नागरिकांना सहज उपलब्ध व्हावी, यासाठी तयार करण्यात येत असलेल्या ‘डॅशबोर्डचे सादरीकरण माहिती तंत्रज्ञान अधिकारी स्वप्नील वानखेडे यांनी केले. तसेच बैठकीत सामान्य प्रशासन विभाग हा विधी विशेष समितीशी संलग्न करण्याबाबत ठराव करण्यात आला. याशिवाय कन्झर्व्हन्सी लेन्स संदर्भातील प्रकरणाच्या सद्यस्थिती, न्यायालयाबाह्य तडजोड करण्यात येऊ शकणाऱ्या प्रकरणाबाबत आढावा घेण्यात आला. याशिवाय बैठकीत महानगरपालिकेच्या मालमत्ता, सार्वजनिक रस्ते, आरक्षित जागा व अतिक्रमण संदर्भातील प्रलंबित कायदेशीर प्रकारण, शिकस्त इमारतीबाबत मनपातर्फे करण्यात येणाऱ्या कार्यवाही, सामान्य प्रशासन विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती संदर्भातील प्रलंबित प्रकरणाचा आढवा, न्यायालयीन अथवा प्रशासकीय कारणामुळ प्रलंबित असलेल्या पदोन्नती प्रकरणाची संख्या, त्याची प्रशासकीय कारणामुळे प्रलंबित असलेल्या पदोन्नती प्रकरणाची संख्या त्याची सद्यस्थिती व त्यावर आवश्यक कार्यवाही बाबत समितीने आढावा घेतला.

समितीच्या बैठकीत वरिष्ठ अधिवक्ते यांची नियुक्ती, निवड निकष, मानधन, जबाबदाऱ्या व प्रकरणांचे वाटप यासाठी प्रमाणित कार्यपद्धती तयार करणे, महानगरपालिकेच्या पॅनल अधिवक्त्यांची नियुक्ती, पात्रता, निवड प्रक्रिया, कार्यपद्धती, कामगिरीचे मूल्यमापन व पुनर्नियुक्ती यासाठी प्रमाणित कार्यपद्धती तयार करणे यावर चर्चा करण्यात आली. याशिवाय मनपाच्या विविध विभागाकडून प्राप्त कायदेशीर अभिप्राय आवश्यक असलेल्या महत्त्वाच्या प्रस्तावावर विस्तृत चर्चा करण्यात आली. यावेळी विविध तडजोडी प्रकरणासाठी विधी सभापती यांनी स्थापत्य आणि विधी विभागाची संयुक्त बैठक बोलविण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. तर समिती सदस्यांनी वरिष्ठ अधिवक्ते यांना देण्यात येणारे खर्चाचे सादरीकरण पुढच्या बैठकीत ठेवण्याच्या सूचना केल्या.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.