spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

विवेक विचार मंच च्यावतीने राज्यस्तरीय सामाजिक न्याय परिषदेचे आयोजन रविवारी.

नागपूर २७ – विवेक विचार मंच वतीने राज्यातील व सहयोगी संस्थांच्या वतीने राजश्री छत्रपती शाहू महाराज जयंती व सामाजिक न्याय दिनाच्या निमित्ताने एक दिवसीय राज्यस्तरीय सामाजिक न्याय परिषदेचे आयोजन रविवार दिनांक 29 जून रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल कन्वेशन सेंटर टेका नाका, न्यू इंदोरा नागपूर येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत राज्यस्तरीय सामाजिक न्याय परिषदेचे आयोजन केले आहे.अशी माहिती राज्य संयोजक व विवेक विचार मंचाचे सागर शिंदे यांनी पत्रपरिषदेत दिली आहे.

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सामाजिक न्याय परिषद नागपूर शहरात संपन्न होणार असून या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांची प्रामुख्याने उपस्थित राहतील व सामाजिक न्याय परिषदेचे अध्यक्ष पद्मश्री नामदेव कांबळे यांची उपस्थिती राहतील व या व्यतिरिक्त मान्यवरांची उपस्थिती राहील. समाजातील वंचित घटकांसाठी काम करणाऱ्या संघटना, सामाजिक कार्यकर्ते, हे सोबत घेऊन या परिषदे मध्ये विचार मंथनातून समाजातील अनेक प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. असे सुद्धा राज्य संयोजक सागर शिंदे यांनी पत्रकारांना सांगितले. पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित मंचावरील राज्यसंयोजक विवेक विचार मंचाचे सागर शिंदे सोबतच सुनील किटकरु, संदीप जाधव, अतुल शेंडे, मनीष मेश्राम व राजू साळवे यावेळी उपस्थित होते.

Popular Articles