spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

आज गुरूमाऊली सेवाश्रमात गुरुपूजन दर्शन सोहळा

बेला :- जवळच्या बरबडी येथील राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या आदिनाथ गुरू माऊली सेवाश्रमात सेवा मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुपूजन व दर्शन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.ब्रह्ममुर्ती शेषानंद पांडे महाराज यांच्या पावन सान्निध्यात हा सोहळा आज उत्साहात साजरा होईल. सर्व भक्त व शिष्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सेवाश्रमाचे अध्यक्ष ओमप्रकाश पांडे, (भद्रावती) सचिव प्रभाकर दोडके (चिंधीचक) व कोषाध्यक्ष प्रकाश घवघवे (सिंदी रेल्वे) यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.

गुरुपौर्णिमेच्या शुभपर्वावर दोन दिवसीय कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे त्यामध्ये मंगळवार २८ जुलैला सायंकाळी ह भ प. पुजाराम खिरटकर(बुटीबोरी) यांचे हस्ते घटस्थापना करण्यात आली. त्यानंतर शालिक उईके यांचे प्रवचन पार पडले. राजूजी मेघरे आदिनाथ गुरूमाऊली पुजन करून हरिपाठ सादर केला तर रात्रीला मसेपठारचे रवींद्र गाडगे महाराज यांचे सेवाश्रमात जाहीर कीर्तनाचा भक्तगण लाभ घेतला.

आज बुधवार(२९) गुरूपौर्णिमाला पहाटे सहस्त्रनाम जप, भूपाळी, काकडा आरती होईल. सकाळी ८ वा. मनोहरराव भिंगारे महाराज (डोरली) यांचा हस्ते गुरुपूजनाचे अभिषेक होईल. सकाळी ११ वा. ब्रह्ममुर्ती शेषानंदबाबा महाराज गुरुगीता पारायण व्दारे भक्तांना मौलिक मार्गदर्शन करतील. सामूहिक आरती व प्रसाद वितरण झाल्यानंतर गुरुपूजन व दर्शन सोहळ्यास प्रारंभ होईल. रात्रोला ९ वा. गुरु उपदेश कार्यक्रम होईल.त्यानंतर महाप्रसादाने सांगता होईल.

Popular Articles