spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची मोवाड नगरपरिषदेला भेट 

मोवाड :- स्थानिक मोवाड नगरपरिषदेला जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी भेट दिली यावेळी त्यांनी शहरातील सुरू असलेल्या व भविष्यात होणाऱ्या कामाचा आढावा घेतला. या आढावा बैठकीला नगराध्यक्ष दर्शना ढोरे , उपाध्यक्ष रवी मालोदे , नगरसेवक ललित खंडेलवाल तर मुख्याधिकारी अमोल परिहार उपस्थित होते. यावेळी शहरातील संपूर्ण परिस्थिती जिल्हाधिकारी याना सांगतात आली. जिल्हाधिकारी यांनी संपूर्ण परिस्थिती अयकून प्रत्येक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी शहरातील असलेल्या रस्त्याची , शहरात सुरू असलेल्या विकास कामाची , नगरपरिषद इमारत व महापुरात वाहून गेलेल्या श्रद्धांजली स्मारकाची पाहणी केली. पाहणी करते वेळी सर्व सभापती , नगरसेवक व कर्मचारी उपस्थित होते.

Popular Articles