spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

नीट फेरपरीक्षेचा पेपरही तीन दिवस आधीच गुजरातमध्ये फुटला : रोहित पवार

मुंबई :- देशात पेपर फुटीचे सत्र सुरूच असताना आता आमदार रोहित पवार यांनी अत्यंत गंभीर आरोप केला आहे. नीट पेपर लीक झाल्यानंतर जी फेरपरीक्षा घेण्यात आली, त्या फेरपरीक्षेचा पेपर सुद्धा तीन दिवस आधीच गुजरातमध्ये फुटल्याचा अत्यंत गंभीर आरोप आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत केला आहे. हे जर सत्य असेल तर खूप अवघड असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

तपास यंत्रणांनी या संदर्भात त्वरित खुलासा करावा

यासंदर्भात रोहित पवार यांनी ट्विटसोबत कागदपत्रं सुद्धा जोडली असून सखोल चौकशीची मागणी केली आहे. रोहित पवार यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, नीट पेपर लीक झाल्यानंतर जी नवीन फेरपरीक्षा घेण्यात आली, त्या परीक्षेचा पेपर देखील तीन दिवस आधीच गुजरात मधून फुटल्याच्या बातम्या समोर येत आहेत. हे सत्य असेल तर खूप अवघड आहे. तपास यंत्रणांनी या संदर्भात त्वरित खुलासा करावा आणि पेपर फुटला असेल तर कुठल्याही दबावाला बळी न पडता यामधील रॅकेट उघडकीस आणावं ही विनंती, असं रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला

दरम्यान रोहित पवार यांनी आपल्या ट्विटसोबत काही डॉक्युमेंट्स सुद्धा जोडले आहेत आणि त्यासोबत एक मेल सुद्धा जोडला आहे आणि या सर्व कागदपत्रांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. दुसरीकडे देशभरामध्ये नीट परीक्षेवरून रणकंदन माजलं असून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला आहे. त्यानंतर केंद्र सरकारकडून सुद्धा नव्याने जो कायदा 2024 मध्ये करण्यात आला होता, त्यामध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत आणि तो कायदा संसदेमध्ये मांडण्यात आला असून या कायद्यावर चर्चा सुरू असून विरोधकांनी सुद्धा केंद्र सरकारला पेपर फुटीवरून घेरलं आहे. त्यामुळे आता फेरपरीक्षेचा सुद्धा पेपर फुटला गेला असेल तर पुन्हा एकदा विरोधक काॅकरोच जनता पार्टी सुद्धा आक्रमक होणार का? हा सुद्धा आता मुद्दा उपस्थित झाला आहे.

Popular Articles