spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

सुख, शांती व समाधानाचा संदेश; योगा ग्रुपतर्फे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

– वृक्षारोपणासह योग शिक्षकांचा वृक्ष देऊन सन्मान; पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश. 

कन्हान :- सुख, शांती समाधान योगा ग्रुपच्या वतीने गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात आला असुन पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत उपस्थित सर्व योग शिक्षकांचा वृक्ष भेट देऊन सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमात गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. तसेच “एक वृक्ष, एक संस्कार” हा संदेश देत वृक्ष संवर्धनासाठी उपस्थितांनी संकल्प केला. योगाच्या माध्यमातुन समाजात आरोग्य, सकारात्मकता आणि निसर्गप्रेम रुजविण्याचे कार्य सुख, शांती समाधान योगा ग्रुपकडून सातत्याने केले जात असल्याचे यावेळी मान्यवरांनी सांगितले. या प्रसंगी ओमप्रकाश काकडे, मिलिंद पोपळकर, शांताराम जळते, शेखर ठाकरे, जितेंद्र चौधरी, प्रतिभा कुंभलकर, यादव, सविता नाटकर, रीना चौबे, सचदेवे, संदीप माहुलकर, मालती पोपळकर, प्रमिला वाईकर, पंकज रामटेके, जळते मॅडम आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संचालन माया इंगोले यांनी केले, तर आभार प्रदर्शन संदीप माहुलकर यांनी मानले. गुरुपौर्णिमा आणि वृक्षारोपण या दुहेरी उपक्रमामुळे कार्यक्रमाला सामाजिक आणि पर्यावरणीय जाणिवेची अनोखी किनार लाभली.

Popular Articles