spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

मराठी भावगीतांचा व चित्रपट गीतांचा सुरेल नजराणा ‘केतकीच्या बनात’

नागपूर :- स्वरबहार या संगीत संस्थेच्यावतीने रसिक श्रोत्यांसाठी ‘केतकीच्या बनात’ या क्लासिक मराठी भावगीतांचा व चित्रपट गीतांचा विशेष संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम रविवारी २ ऑगस्ट रोजी, सायंकाळी ५.३० वाजता. शंकर नगर येथील श्रीमंत बाबूराव धनवटे सभागृहात (श्री साई सभागृहाच्या वर, वोक्हार्ट हॉस्पिटलच्या मागील बाजूस, शंकर नगर चौक) आयोजित करण्यात येणार आहे.

मराठी भावगीतांचा आणि चित्रपट गीतांचा सुरेल संगम अनुभवण्याची संधी या कार्यक्रमातून नागपूरकर रसिकांना मिळणार आहे. संगीतप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सुरेल मैफिलीचा आनंद घ्यावा, असे आवाहन स्वरबहारचे संयोजक प्रशांत मुनशी यांनी केले आहे. या कार्यक्रमासाठी प्रवेश पूर्णपणे विनामूल्य असून सर्व संगीतप्रेमींनी या सांगीतिक मेजवानीचा लाभ घ्यावा, असेही आयोजकांनी कळविले आहे.

Popular Articles