spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे लुगडी प्रशिक्षण शिबिराचा उत्साहात समारोप

कन्हान :- महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, गट क्र. १, नागपुर अंतर्गत कामगार कल्याण केंद्र कन्हान येथे महिलांना स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने आयोजन केलेल्या लुगडी प्रशिक्षण शिबिराचा उत्साहात समारो प झाला.

प्रशिक्षण शिबीर सहाय्यक कल्याण आयुक्त श्रीकांत धोत्रे आणि कामगार कल्याण अधिकारी गट क्रमांक १ चे छोटु जाधव यांच्या नेतृत्वात यशस्विपणे दि. १३ जुलै ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत प्रशिक्ष णात महिलांना लुगडी तयार करण्याचे कौशल्य, त्याती ल विविध तांत्रिक बाबी तसेच स्वयंरोजगाराच्या संधीं बाबत मार्गदर्शन करण्यात आले. समारोपिय कार्यक्रमाच्या अध्यक्षा मनिषा चिखले तर प्रमुख अतिथी म्हणुन सामाजिक कार्यकर्त्या दिशा पाटील, पूजा सुगंधे उप स्थित होत्या. प्रशिक्षण शिबिराच्या प्रशिक्षिका स्नेहा राणे यांनी प्रशिक्षणार्थींना प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांसह सवि स्तर मार्गदर्शन केल्याने प्रशिक्षणार्थीं मध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. प्रशिक्षणात सहभागी महिलांनी प्रशिक्षणातुन प्राप्त कौशल्याचा उपयोग करून स्वयं रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्याचा निर्धार व्यक्त केला. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या या उपक्रमामुळे महिलांच्या कौशल्य विकासाला चालना मिळाल्याबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त केले. कार्य क्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन पौणिकर  यांनी केले. शिबिराचे यशस्वि आयोजनासाठी प्रेमा कावळे यांनी विशेष सहकार्य केले.

Popular Articles