spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

जिल्हा परिषद प्राथमिक सेमी इंग्लिश स्कूल भोवरी मध्ये साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांची जयंती झाली साजरी

किशोर साहू, मौदा :- जिल्हा परिषद प्राथमिक सेमी इंग्लिश स्कूल भोवरी येथे अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या प्रतिमेला माल्यार्पण, पूजा अर्चना करून त्यांच्या जीवनपटावर प्रकाश टाकला.

याप्रसंगी अण्णाभाऊ साठे यांनी केलेल्या संघर्षावर मुख्याध्यापिका पठाण यांनी सांगितले की, “साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांनी शाहिरी, पोवाडे आणि लावणीच्या माध्यमातून शोषितांचा आवाज उठवला.संयुक्त महाराष्ट्र लढा आणि गोवा मुक्तिसंग्राम यात त्यांनी शाहिरीच्या माध्यमातून मोठी जनजागृती केली.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी उपेक्षित व शोषित घटकांच्या हक्कासाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले. गोर-गरीब शेतकरी, शेतमजूर, श्रमिक, दलित, पददलितांचा व्यथा-वेदना कथा, कादंबऱ्यांमधून प्रकर्षाने उमटाव्यात त्यांची अशी धारणा होती.”

याप्रसंगी विशेष अतिथी म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अंकुश निरगुळकर ,उपाध्यक्ष प्रल्हाद वैद्य, ग्रामपंचायत सदस्य काशिनाथ गिर्हेपुंजे, माता पालक अश्विनी बावणे, निकिता वैद्य, ज्योती वैद्य, रोहिणी चोपकर ,अंगणवाडी सेविका ज्योती वाडीभस्मे , मदतनीस सेजल बावणे, ग्रामस्थ श्याम वैद्य, अर्जुन न्यायखोर, संजय न्यायखोर उपस्थिती होते.

Popular Articles