– ‘गाव तिथे शाखा’ अभियान, पदवीधर मतदार नोंदणी मोहीम आणि २२ ऑगस्टला सिंदेवाही येथे समाज प्रबोधन मेळाव्याचा निर्णय
पंकज परशुरामकर, नवेगावबांध :- कोहळी पाटील संघर्ष मंच, जिल्हा शाखा गोंदिया यांच्या वतीने जिल्हाध्यक्ष चामेश्वर गहाणे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित विशेष सभेत संघटन विस्तार, समाज प्रबोधन आणि आगामी उपक्रमांबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यावेळी मंचाचे कार्याध्यक्ष विजय कापगते, उपाध्यक्ष किशोर डोंगरवार, मार्गदर्शक डॉ. गजानन डोंगरवार तसेच समन्वयक ललित बाळबुद्धे यांची प्रमुख उपस्थिती होती. सभेत १२ जुलै २०२६ रोजी वडसा येथे झालेल्या केंद्रीय बैठकीचा आढावा घेण्यात आला. केंद्रीय अध्यक्षपदी प्रकाश बाळबुद्धे, कार्याध्यक्षपदी दिवाकर निकूरे यांची निवड झाल्याची माहिती देण्यात आली. गोंदिया जिल्ह्यातून केंद्रीय मार्गदर्शक म्हणून गंगाधर परशुरामकर, डॉ. गजानन डोंगरवार, प्रमोद लांजेवार, गजानन कापगते, अविनाश काशीवार, यशवंत परशुरामकर, रचनाबाई गहाणे व विजयाताई कापगते यांची नियुक्ती करण्यात आली असून केंद्रीय उपाध्यक्षपदी जयश्री देशमुख, चंद्रकला डोंगरवार, प्रभाकर गहाणे, किशोर डोंगरवार, रामलाल गहाणे, प्रकाश गहाणे आणि अशोक कापगते यांची निवड करण्यात आली. तसेच गोंदिया जिल्हाध्यक्षपदी चामेश्वर गहाणे व कार्याध्यक्षपदी विजय कापगते यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली. यावेळी अर्जुनी मोरगाव तालुका कार्यकारिणीचीही घोषणा करण्यात आली. तालुका अध्यक्षपदी कोमल डोंगरवार (नवेगावबांध) तर तालुका कार्याध्यक्षपदी रमण परशुरामकर (महागाव) यांची निवड करण्यात आली. जि.प. सर्कल उपाध्यक्ष म्हणून नवेगावबांध सर्कलमधून जयंत लांजेवार, हेमकृष्णा संग्रामे व हितेश लांजेवार, माहूरकुडा सर्कलमधून लक्ष्मीकांत नाकाडे, रमेश मस्के व तानाजी लांजे, तर महागाव सर्कलमधून मंगेश नाकाडे, राजेंद्र नाकाडे व अनिल देशमुख यांची निवड जाहीर करण्यात आली. महिला उपाध्यक्षपदी कविता कापगते, तेजुकला गहाणे, शारदा नाकाडे, कुंदा डोंगरवार, नंदा गहाणे, शालिनी डोंगरवार, कुंदा लोगडे व शांता परशुरामकर यांची निवड करण्यात आली. कार्यकारिणी सदस्य म्हणून वसंत नाकाडे, अमृत लोगडे, रेशीम कापगते, वैशाली गहाणे, गुणिता नाकाडे, पूजा कापगते, संध्या आरसोडे, अरुणा झोडे, उषा डोंगरवार, हेमलता हातझाडे व ममता लांजे यांना संधी देण्यात आली. सभेत ‘गाव तिथे शाखा’ ही संघटन विस्तार मोहीम पुढील आठ दिवसांत प्रत्येक गावात राबविण्याचा निर्णय घेण्यात आला असून यासाठी चामेश्वर गहाणे, विजय कापगते व रामदास बोरकर यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली. समाजातील पदवीधर मतदारांची संख्या वाढविण्यासाठी महिनाभर विशेष नोंदणी अभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात आला असून या मोहिमेची जबाबदारी रामदास बोरकर व दिलीप लोदी यांच्याकडे सोपविण्यात आली. तसेच २२ ऑगस्ट २०२६ रोजी सिंदेवाही येथे समाजातील आजी-माजी लोकप्रतिनिधी, अधिकारी व मान्यवरांचा ‘उद्बोधन मेळावा’ आयोजित करण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. या मेळाव्यास समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून संघटन बळकट करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले. सभेच्या शेवटी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.





