spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

इनर व्हील डिस्ट्रिक्ट ३०३ च्या अध्यक्षपदी मनीषा चौधरी

नाशिक :- इनर व्हील डिस्ट्रिक्ट ३०३च्या वर्ष २०२६ -२७ च्या नव्या नेतृत्वाचा शुभारंभ नाशिक येथे झालेल्या ३६ व्या डिस्ट्रिक्ट असेंब्ली “आयाका” मध्ये उत्साहात झाला. यावेळी सौ. मनीषा चौधरी यांनी डिस्ट्रिक्ट चेअरमन म्हणून पदभार स्वीकारला.

समारंभाच्या प्रमुख पाहुण्या डॉ. बीना व्यास, तर विशेष अतिथी डॉ. रश्मी शर्मा होत्या. निवृत्त डिस्ट्रिक्ट चेअरमन रमा गर्ग यांनी आपल्या कार्यकाळाचा आढावा घेत पदभार मनीषा चौधरी यांच्याकडे सुपूर्द केला.

यानंतर मनीषा चौधरी यांनी नव्या जिल्हा कार्यकारिणीची घोषणा केली. यामध्ये डिस्ट्रिक्ट व्हाइस चेअरमन विद्या रघुशे, आयपीडीसी व असोसिएशन कौन्सिल सदस्य रमा गर्ग, डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी मोनिका झुनझुनवाला, डिस्ट्रिक्ट ट्रेझरर योगिता बंग, डिस्ट्रिक्ट आयएसओ स्वाती वानकर, डिस्ट्रिक्ट एडिटर डॉ. उज्ज्वला मोहता, डिस्ट्रिक्ट ईएसओ पीडीसी जुलेखा शुक्ला तसेच डिस्ट्रिक्ट सीसीसीसी पीडीसी कीर्ती चांदे यांचा समावेश आहे.

स्वीकृतीपर भाषणात मनीषा चौधरी यांनी आंतरराष्ट्रीय इनर व्हील अध्यक्षा इंगलॉग विन्थेम्न यांच्या “Grow and Flourish” या वर्षाच्या संकल्पनेनुसार सेवा, मैत्री आणि नेतृत्व अधिक सक्षम करण्याचा संकल्प व्यक्त केला.

यावेळी डिस्ट्रिक्ट डायरेक्टरी तसेच डिस्ट्रिक्ट वृत्तपत्र “मालती” यांचे प्रकाशन डॉ.बीना व्यास व डॉ.रश्मी शर्मा यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरलेल्या “क्लीन कुंभ” या जिल्हास्तरीय प्रकल्पांतर्गत डिस्ट्रिक्ट ३०३ मधील ३० इनर व्हील क्लबांनी एकत्रितपणे ८० मोठ्या कचरा पेट्यांचे दान केले. ऑक्टोबर २०२६ पासून नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्यात स्वच्छता व कचरा व्यवस्थापनासाठी या कचरा पेट्या नाशिक महानगरपालिकेकडे सुपूर्द करण्यात आल्या.

समारंभास जिल्ह्यातील विविध क्लबांतील सुमारे २५० सदस्य तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते. आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.