spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती विभागाच्या महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी राजेश रंगारी यांची नियुक्ती

नागपूर :- अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती विभाग (महाराष्ट्र प्रदेश) सचिवपदी नागपूरचे सामाजिक व राजकीय कार्यकर्ते राजेश रंगारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे नागपूरसह संपूर्ण विदर्भातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. सामाजिक न्याय, संविधानिक मूल्यांचे संरक्षण, अनुसूचित जाती समाजाचे सक्षमीकरण तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने कार्य करणारे राजेश रंगारी यांच्यावर पक्षश्रेष्ठींनी दाखविलेला विश्वास हा त्यांच्या संघटनात्मक व सामाजिक कार्याची पोचपावती असल्याची भावना काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. नवीन जबाबदारी स्वीकारल्यानंतर राजेश रंगारी यांनी पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी, अनुसूचित जाती समाजाच्या हक्कांसाठी, सामाजिक समता आणि संविधानिक मूल्यांच्या संरक्षणासाठी पूर्ण प्रामाणिकपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच पक्ष नेतृत्वाने दाखविलेल्या विश्वासाबद्दल त्यांनी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, राजेंद्र पाल गौतम, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, प्रदेश उपाध्यक्ष किशोर कन्हेरे, राष्ट्रीय प्रवक्ते अतुल लोंढे, अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष अनिरुद्ध वनकर, रामटेकचे खासदार श्याम बर्वे, माजी मंत्री सुनील केदार, माजीमंत्री व आमदार डॉ. नितीन राऊत, आमदार संजय मेश्राम, आमदार विकास ठाकरे, नागपूर शहर काँग्रेस अध्यक्ष प्रफुल्ल गुढधे पाटील यांच्यासह सर्व वरिष्ठ नेत्यांचे आभार मानले. राजेश रंगारी यांच्या नियुक्तीबद्दल विविध सामाजिक, राजकीय व स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी तसेच काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते श्याम चौधरी, अजय महादुरे, संतोष सिंग, रिझवान अन्सारी, विजय नाडेकर, गिरीधर मुरोडिया, राहुल पळाडे, ऋषी कारंडे, ईश्वर बर्डे, किशोर गायधने, सुरेश गेडाम, गजानन चकोले, नरेंद्र मारघडे, उमेश डेकाटे, भीमराव सहारे, महेंद्र जीवने, राजू वनकर, लिलाधर खैरकर, अनिकेत रंगारी, प्रीतम रामटेके, बाळा रघोर्ते, अब्दुल कादीर, मनोज मेश्राम, विजय शेंडे, पुरोहित कांबळे, सुरेश गजभिये, निवृत्ती मेश्राम, राजीव अंबादे, विजय चालपे, दीपक थोरात, अनिल निंभोरकर आदींनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Popular Articles